'प्रचाराला खोडा घालण्यासाठी भाजपकडून सरकारी यंत्रणेचा गैरवापर'

काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड निवडणूक आयोगाकडे करणार तक्रार
Sunil Kauthankar and Durgadas Kamat in Congress-Goa Forward PC
Sunil Kauthankar and Durgadas Kamat in Congress-Goa Forward PCDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : पराभवाच्या भीतीने विरोधकांच्या प्रचाराला खोडा घालण्यासाठी भाजप सरकारी यंत्रणेचा वापर करत असल्याचा आरोप काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षाने सोमवारी केला. काँग्रेसचे सरचिटणीस सुनील कवठणकर आणि गोवा फॉरवर्डचे संघटनमंत्री दुर्गादास कामत यांनी सोमवारी पणजीत संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली आणि या दोन्ही युतीतील पक्षांविरोधात सरकारी यंत्रणेचा वापर केल्यास भाजपला न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागेल, असे सांगितले. (Congress-Goa Forward PC News Updates)

Sunil Kauthankar and Durgadas Kamat in Congress-Goa Forward PC
गोविंद गावडेंच्या मतांचे मडकईतून प्रियोळात स्थलांतर?

सुनील कवठणकर म्हणाले की, 'भाजप विरोधकांना प्रचारापासून परावृत्त करण्यासाठी सरकारी यंत्रणा वापरत असल्याने लोकशाहीचे सार धोक्यात आले आहे. ‘लोकशाहीत सर्वांना समान हक्क आहे. मात्र भाजप विरोधकांना त्रास देत आहे,' असे ते म्हणाले. 'भाजप नेते दहाहून अधिक समर्थकांसह प्रचार करत आहेत. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. आम्ही सर्व नियमांचे पालन करून प्रचार केला तरीही भाजप सरकार केवळ काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डला त्रास देत आहे.' असे ते म्हणाले.

काँग्रेसला (Congress) जो लोकांकडून पाठिंबा मिळत आहे तो बघून भाजप वैफल्यग्रस्त झाला आहे. भाजप निराशेच्या स्थितीत आहे आणि म्हणूनच ते विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करत आहेत, असा निशाणाही कवठणकर यांनी साधला.

Sunil Kauthankar and Durgadas Kamat in Congress-Goa Forward PC
'मगो-तृणमूल युतीला गोमंतकीयांना साथ द्यावी'

दरम्यान काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डचे (Goa Forward Party) सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना न्यायालयाला सामोरे जावे लागेल, असा इशारा गोवा फॉरवर्डच्या दुर्गादास कामत यांनी दिला आहे. 'मुख्यमंत्री आपल्या अधिकाराचा गैरवापर करून विरोधकांना त्रास देत आहेत. आम्ही शांत बसणार नाही, तर भाजपच्या कृतीविरोधात दिल्ली येथील निवडणूक आयोगाला पत्र लिहू,' असे कामत यांनी स्पष्ट केले आहे.

Sunil Kauthankar and Durgadas Kamat in Congress-Goa Forward PC
प्रतापसिंग राणेंनी प्रचाराचा नारळ फोडला

सरकारी अधिकारी हे सरकारचे बाहुले बनले असून भाजप (BJP) नेत्यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. 'सरकारी अधिकाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे की भाजपचा पराभव होईल आणि गोवा फॉरवर्डसह काँग्रेस पुढील सरकार स्थापन करेल. त्यांनी भाजपच्या इशाऱ्यावर काम करणे थांबवावे,' असे कामत म्हणाले.

कामत पुढे म्हणाले की, भाजप सरकार विरोधी पक्षांवर खोट्या एफआयआर दाखल करु शकते आणि आवाज दाबण्याचा प्रयत्न करू शकते. आम्हाला भाजपच्या योजना माहित आहेत, ते आम्हाला कसे त्रास देतील. पण आम्ही त्यांच्या दादागिरीविरुद्ध लढू,' असा इशाराही कामत यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com