'मगो-तृणमूल युतीला गोमंतकीयांना साथ द्यावी'

मगोचे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकर यांनी मडकईतून भरला उमेदवारी अर्ज
MGP Sudin Dhavalikar Filed Nomination for Goa Election
MGP Sudin Dhavalikar Filed Nomination for Goa ElectionDainik Gomantak

फोंडा : मगोपचे सर्वेसर्वा आणि मडकई मतदारसंघातून मगोचे उमेदवार सुदिन ढवळीकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. फोंडा उपजिल्हाधिकारी कार्यालयात सुदिन ढवळीकरांनी अर्ज भरला. यावेळी त्यांच्यासोबत मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर उपस्थित होते. यावेळी सुदिन ढवळीकरांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि गोमंतकीय जनता मगो आणि तृणमूल काँग्रेस युतीलाच मत देणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. (MGP Sudin Dhavalikar News Updates)

MGP Sudin Dhavalikar Filed Nomination for Goa Election
पर्वरीत भाजप-रोहन खंवटेंची गळाभेट,पण मने दुभंगलेलीच!

सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी मडकईतून तर मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी प्रियोळमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. केतन भाटीकर यांनी मगोची फोंड्यातून उमेदवारी दाखल केली आहे. मगोची गोव्यात तृणमूल काँग्रेससोबत (TMC) युती असून आपलाच विजय होणार असल्याचा विश्वासही ढवळीकर बंधूंनी व्यक्त केला आहे.

MGP Sudin Dhavalikar Filed Nomination for Goa Election
गोविंद गावडेंच्या मतांचे मडकईतून प्रियोळात स्थलांतर?

गोव्यात लवकरच मोठे परिवर्तन होणार असून मगो (MGP) आणि तृणमूल काँग्रेसची अभेद्य युती हे परिवर्तन घडवणार आहे. त्यामुळे गोमंतकीय जनतेने या युतीला भरभरुन पाठिंबा आणि मत देऊन विजयी करावे, असे आवाहनही मगोच्या सुदिन ढवळीकर यांनी केले आहे. फोंड्यात सुदिन ढवळीकर यांनी दीपक ढवळीकर आणि केतन भाटीकर यांच्यासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com