दिव्या राणेंच्या एंट्रीने पर्येतून काँग्रेसचे ‘बहिर्गमन’?

प्रतापसिंग राणे रिंगणात नसल्याने भाजपला मतदारसंघ काबीज करण्याची संधी
PratapSingh Rane and Divya Rane in Poriem Constituency
PratapSingh Rane and Divya Rane in Poriem ConstituencyDainik Gomantak

मिलिंद म्हाडगुत

पर्ये हा माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांचा हुकमी मतदारसंघ. तब्बल 11 वेळा राणे इथून निवडून आले आहेत. 1972 ते 2017 असा प्रतापसिंग राणेंचा प्रवास आहे. सुरुवातीला ते सत्तरी मतदारसंघातून जिंकत असत.पण 1989 साली पर्ये मतदारसंघ अस्तित्वात आल्यावर ते पर्येतून निवडणूक लढवित आहेत व जिंकतही आहेत. राणेंमुळेच पर्ये हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला ठरला होता. पण प्रतापसिंग राणेंचे पुत्र विश्वजीत यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सत्तरीची समीकरणे बदलली. आता पर्ये हा हळूहळू भाजपच्या वाटेवर जावू लागला आहे. यंदा प्रथमच प्रथमच प्रतापसिंग राणे हे निवडणूक रिंगणात नाहीत,त्यामुळे भाजपला संधी असल्याची चिन्हे आहेत. (Poriem Constituency News Updates)

PratapSingh Rane and Divya Rane in Poriem Constituency
पणजीला जागतिक दर्जाचे शहर बनवणार: सत्येंद्र जैन

वास्तविक प्रतापसिंगाना अजूनही निवडणूक लढवायची इच्छा होती. 83 वर्षाचे खासे यांनी तयारीही सुरु केली होती. कॉंग्रेसने (Congress) त्यांची उमेदवारी जाहीरही केली होती. पण आरोग्यमंत्री विश्वजीतांनी आधीच आपली पत्नी डॉ. दिव्या राणे यांना पर्येतून रिंगणात उतरवण्याचे निश्चित केल्यामुळे ज्येष्ठ राणेंना माघार घ्यावी लागली. आता त्यांच्या जागी कॉंग्रेसतर्फे रणजीत राणे हे निवडणूक लढवित आहेत.

शिवसेनेतर्फे गुरुदास गांवकर हे रिंगणात असून सेनेचे पर्येत बांधणीच नसल्यामुळे ते विशेष ‘करिष्मा’ दाखवू शकतील, असे वाटत नाही. आरजीने समीर सतरकर यांना उमेदवारी दिली आहे. तृणमूल (TMC) मगोप युतीने गणपत गांवकर यांना रिंगणात उतरविले असून ते काय ‘चमत्कार’ करतात ते बघावे लागेल. पण सध्या तरी या मतदारसंघावर डॉ.दिव्या राणे यांचाच वरचष्मा दिसत आहे.याला आप, कॉंग्रेस वा अन्य कोणी विरोधक ‘सुरुंग’ लावू शकतात,का याचे उत्तर निकालातून मिळेल.

PratapSingh Rane and Divya Rane in Poriem Constituency
प्रियंका गांधीनी कोरोनाचे नियम मोडले: तृणमूल

सत्तरीत विश्‍वजीत राणेंचा जनसंपर्क दांडगा !

संपूर्ण गोव्यात भाजपविरोधी वातावरण असले तरी सत्तरीत त्याचा मागमूस दिसत नाही. सत्तरी तालुका हा संपूर्णपणे विश्वजीत राणे यांच्याकडे असल्यासारखा वाटत आहे. डॉ. दिव्या राणे बऱ्याच दिवसांपासून या मतदारसंघात सक्रिय असून त्यांनी मतदारांशी चांगलाच संपर्क साधला आहे. त्यांना युवकांचा चांगलाच पाठिंबा लाभत आहे. सत्तरीतील बहुतेक युवकांना आरोग्य खात्यात नोकऱ्या मिळाल्यामुळे ते विश्वजीत राणेंच्या पाठीशी असल्याचे चित्र सत्तरीत आहे. आणि त्याचा लाभ डॉ. दिव्या राणे यांना होऊ लागला आहे. याकरिता संपूर्ण गोवा एकीकडे व सत्तरीकडे दुसरीकडे, असे चित्र सध्या दिसते आहे.

PratapSingh Rane and Divya Rane in Poriem Constituency
मडकईत पुन्हा होणार ‘सिंहगर्जना’?

'आप'चीही पर्येत चर्चा !

आपतर्फे (Aam Aadmi Party) पर्ये मतदारसंघातून विश्वजीत कृ.राणे हे रिंगणात आहेत. राणे हे जरी एकदाही निवडणूक जिंकले नसले तरी एक ‘अनुभवी ’ उमेदवार म्हणून गणले जातात. आता त्यांच्याबरोबर ‘आप’ सारखा गोव्यात ‘हवा’ असलेला पक्ष असल्यामुळे ते किती उडी घेतात, हे बघावे लागेल. पण सध्या तरी कॉंग्रेसपेक्षा आपनेच मोठी मजल मारल्यासारखे दिसते आहे.

...तेव्हा पिता-पुत्र, आता पती-पत्नी

2012 सालीही हेच चित्र दिसत होते. त्यावेळी संपूर्ण गोव्यात कॉंग्रेस विरोधी लाट होती,असे असूनही सत्तरीतील पर्ये व वाळपई या दोन्ही मतदारसंघातून पिता व पुत्र विजयी झाले होते. आता पितापुत्रांची जागा राणे पती-पत्नींनी घेतली आहे. पण यामुळे समीकरणे बदलली, असे वाटत नाही. मात्र, यामुळे कॉंग्रेसचे नुकसान होऊ शकते. कॉंग्रेसचे रणजीत राणे हे डॉ. दिव्या यांच्याशी किती लढत देतात हे बघावे लागेल. ज्येष्ठ राणे यांनी जरी आपण कॉंग्रेस उमेदवाराच्या पाठीशी असेन, असे सांगितले तरी त्यांचे वय त्यांना या बाबतीत परवानगी देईल, असे दिसत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com