सांत आंद्रेत सात उमेदवार, रंगणार चुरशीची लढत

भाजप आमदार फ्रान्सिस सिल्वेरांसमोर आप, काँग्रेसचे आव्हान
BJP St Andre Candidate Francis Silveira
BJP St Andre Candidate Francis SilveiraDainik Gomantak

पणजी : सांत आंद्रे मतदारसंघात विधानसभा निवडणूक चुरशीची लढत ठरणार असल्याची चिन्हे एकंदर परिस्थितीवरून दिसत आहेत. सात उमेदवार रिंगणात असून.यात भाजप, आरजी, कॉंग्रेस, आप, तृणमूल,राष्ट्रवादी व अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. (BJP St Andre Candidate Francis Silveira News Updates)

BJP St Andre Candidate Francis Silveira
Goa Assembly Election: बाबू केपेचा 'गड' राखणार का ?

भाजपचे (BJP) फ्रान्सिस सिल्वेरा यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्यांनी याच मतदारसंघातून पाच वेळा गोवा विधानसभा निवडणुका लढविल्या होत्या. त्यात चारवेळा त्यांनी बाजी मारली होती. केवळ एकदाच पराभवाला त्यांना सामोरे जावे लागले होते.आता २०२२ ची विधानसभा निवडणूक ते भाजपच्या तिकिटावर लढवत आहेत.

BJP St Andre Candidate Francis Silveira
दिल्लीत शिक्षण, आरोग्य आणि इतर क्षेत्रात आप अपयशी; अभिषेक सिंघवींची टीका

रामराव वाघ यांना गेल्या निवडणुकीत सिल्वेरांकडून हार पत्करावी लागली होती. कुशल प्राध्यापक म्हणून वाघ परिचित आहेत. ही निवडणूक ते आपच्या तिकिटावर लढवत आहेत. जगदीश भोबे यांनी तृणमूल कॉंग्रेसतर्फे (TMC) जबर आव्हान उभे केले आहे. २०१७ निवडणूक त्यांनी मगो पक्षातर्फे लढविली होती.कॉंग्रेसचे (Congress) उमेदवार अँथोनी फर्नांडिस हे आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे स्टीव्हन डिसौझा व आरजी पक्षाचे विरेश बोरकर हे नवे चेहरे रिंगणात आहेत. रामा काणकोणकर अपक्ष उमेदवार म्हणून ही लढवत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com