Goa Assembly Election: बाबू केपेचा 'गड' राखणार का ?

काँग्रेस,आपचे आव्हान: लक्षवेधी लढत
Babu Kavlekar
Babu KavlekarDainik Gomantak
Published on
Updated on

केपे: केपे मतदारसंघच हा बाबू कवळेकर यांचा `गड` मानला जातो. पूर्वी हा मतदारसंघ म.गो.पक्षाचा बालेकिल्ला होता. पण 1999 मध्ये मगो पक्षातर्फे निवडून आलेल्या प्रकाश वेळीप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला व तिथेच केपेची समीकरणे बदलू लागली. 2002 साली काँग्रेसचे बाबू कवळेकर भाजपचे प्रकाश वेळीप यांचा पराभव करून विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर 2007 ,2012,व 2017 मध्ये विजय मिळवून बाबू कवळेकरांनी आपण केपेचे अनभिषिक्त सम्राट असल्याचे सिद्ध केले. (Goa Election Update)

Babu Kavlekar
गोव्यात काँग्रेसच्या आक्रमक प्रचाराने भाजपसह इतर पक्ष ‘बॅकफुट’वर

पण 2019 मध्ये बाबूंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे पुन्हा एकदा समीकरणे बदलू लागली आहेत. यंदा बाबू हे भाजपचे उमेदवार असल्यामुळे त्यांना काँग्रेसतर्फे एल्टन डिकॉस्टा व आपतर्फे राऊल परेरा हे ललकारत आहेत. विशेष म्हणजे केप्यात अजूनतरी कमळ फुललेले नाही. त्यामुळे बाबू कवळेकर हा भाजपचा हुकमाचा`एक्का` बनला आहे. हा `एक्का` भाजपला केपेचा गड मिळवून देतो का, हे बघावे लागेल. उपमुख्यमंत्री झाल्यामुळे बाबू कवळेकरांचा या मतदारसंघाशी चांगलाच संपर्क आहे. मात्र पक्षांतरामुळे त्यांच्याबाबत काहीशी नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. मागे झालेल्या केपे नगरपालिकेच्या निवडणुकीत बाबू कवळेकरांच्या पॅनलचा विजय झाला होता.

काँग्रेसच्या एल्टन डिकॉस्टा यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. मात्र, आपचे राऊल परेरा, ते काँग्रेसच्या मतपेढीला धक्का पोहचवू शकतात. आप व काँग्रेसने विरोधी मतांचे विभाजन केल्यास कवळेकर पुन्हा विधानसभेत पोहचू शकतात.

तृणमूलतर्फे (TMC) कांता गावडे रिंगणात उतरले आहेत. कांता हे प्रियोळ मतदारसंघातील असल्याने त्यांचे केपेत काय काम, असा प्रश्‍न उपस्थित केला जात असून त्यांच्या उमेदवारीचा अर्थ स्पष्ट होत नाही.पण आदिवासी मते `लक्ष्य` करण्याच्या हेतूने तृणमूलने गावडे यांना आयात केले असावे, असे वाटते. `आरजी`तर्फे विशाल देसाई हे रिंगणात असले तरी त्यांचा विशेष प्रभाव दिसत नाही.

Babu Kavlekar
प्रियंका गांधी आज एकदिवसीय गोवा दौऱ्यावर

शिवसेनेतर्फे (Shiv Sena) आलेक्स फर्नांडिस हे निवडणूक लढवीत आहेत. ते किती मते घेतात बघावे लागेल. राष्ट्रवादीनेही ॲलायसिस डिमेलो यांना रिंगणात उतरविले असून ते काँग्रेसच्या मतांत काटछाट करतील,असे वाटत नाही. एकदरीत केपेत बाबू जरी `डेंजर झोन` मध्ये वाटत असले तरी विरोधी मतांचे विभाजन त्यांच्या पथ्यावर पडू शकते. आता खरेच बाबू हा गड राखतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

काँग्रेस मते अधिक पण...

केपेत काँग्रेसच्या मतांचे प्रमाण व बऱ्यापैकी असल्यामुळे केपेत कॉंग्रेस (Congress) उमेदवारही चमत्कार घडवू शकतात. 2017 साली बाबू यांना 12525 मते प्राप्त झाली होती. आणि त्यांनी अडीच हजार मतांनी विजय मिळविला होता. आता यावेळी बाबू कवळेकर ही मतपेढी राखतात का, हे पाहावे लागेल. केपेत भाजपपेक्षा काँग्रेसचे अधिक मतदार आहेत. पण बाबू कवळेकर यांच्या भाजप प्रवेशामुळे मतेही भाजपकडे वळू लागली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com