Old Man Burning: नव्या वर्साक येवकार, पण 'ती' ओल्ड मॅन जाळण्याची परंपरा काय?

New Year Eve Goa: ३१ तारखेला म्हणजेच वर्षाच्या शेवटच्या दिवशी या ओल्ड मॅनला रात्री १२ वाजता जाळलं जाईल.
 New Year Ritual Goa
Goa New Year Dainik Gomantak
Published on
Updated on

Burning Old Man New Year Ritual, Goa

गोव्यात नवीन वर्षाची जोरदार तयारी सुरु आहे. कालपासून म्हणजेच ३० डिसेंबरपासून आज म्हणजेच ३१ डिसेंबरपर्यंत गोव्यात ओल्ड मॅन बनवण्याची तयारी सुरु झाली आहे. गावागावातील वाड्यांवरची मुलं सध्या एकत्र येऊन हा ओल्ड मॅन बनवण्यासाठी कापट्या, गवत, जुनी कापडं जवळ करतायत. ३१ तारखेला म्हणजेच वर्षाच्या शेवटच्या दिवशी या ओल्ड मॅनला रात्री १२ वाजता जाळलं जाईल. वर्षभर आपल्यासाठी ज्या गोष्टी वाईट ठरल्या, पटल्या किंवा रुचल्या नाहीत त्या सर्वांची एक यादी करून ओल्ड मॅनवर चिकटवायची आणि त्याला आग लावायची अशी ही प्रथा आहे.

जुन्या गोष्टी विसरून नवीन सुरुवात करणं हे खरंतर सकारात्मकतेचं प्रतीक आहे. दुःख कुरवाळत बसण्याला काही अर्थ नाही याउलट दुःखावर मात करत पुढे जाणं हा मार्ग सोपा आणि फायदेशीर ठरतो. गोव्यातल्या ओल्ड मॅनची प्रथा आपल्याला हेच सांगते ज्या गोष्टी नवीन वर्षात घेऊन जायच्या नाहीत त्यांना जाळून टाकायचं.

 New Year Ritual Goa
New Year 2025: सरत्या वर्साक निरोप आनी नव्या वर्साक येवकार..

ते आपल्या जीवनाचा भागच नाही असं समाजयचं. तुम्ही गोव्यात असाल तर सध्या तुम्हाला लहान मुलं एकत्र येऊन हेच काम करताना दिसत असतील, त्यांना आज रात्री या ओल्ड मॅनला जाळून टाकायचं आहे. इंग्रजी संस्कृती प्रमाणे नवीन दिवस हा १२ वाजता सुरु होतो आणि म्हणूनच यावेळीच ओल्ड मॅनला जाळून नवीन सुरुवात करायची असते.

तुम्ही गोव्यात असाल तर या ओल्ड मॅनला जाळताना नक्की बघून या. लहानमुलांकडून पाळली जाणारी ही परंपरा गावागावांमध्ये पाहायला मिळेल. काहीसं म्युझिक असेल आणि नवीन वर्षाची सुरुवात होईल. त्यानंतर नवीन वर्ष नवीन उमेद घेऊन येणारं आणि सकारात्मकतेने भरलेलं असावं म्हणून सगळे प्रार्थना करणार आहेत. आव्हानं नक्कीच येतील मात्र ती पेलून न्यायची ताकद ठेवा. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com