Manish Jadhav
पर्यटकांना साद घालणारा गोवा न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी सज्ज झाला आहे.
सरत्या वर्षाला बाय-बाय करत नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी तुम्ही गोव्याचा प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासाठी पर्वणी ठरेल.
आज (30 डिसेंबर) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून गोव्यात तुम्ही न्यू ईयर सेलिब्रेशन केल्यानंतर कुठे गोवन फूडचा आनंद घेवू शकता याबाबत जाणून घेणार आहोत.
न्यू ईयर सेलिब्रेशनची पार्टी केल्यानंतर तुम्ही गोवन फूडवर ताव मारु शकता. अस्सल गोवन मसाल्यांमधील फूड खवय्यांसाठी पर्वणीच ठरतात.
हॉटेल्स, रेस्टारंट हे खवय्यांसाठी हॉटस्पॉट बनले आहेत. प्रसिद्ध फूड कोर्ट, हॉटेल्स, रेस्टारंट, स्टॉलवर खवय्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
पणजीतील द फिशरमन्स वॉर्फ या हॉटेलला तुम्ही नक्की भेट दिली पाहिजे. इथं मिळणारे लॉब्स्टर, स्क्विड फ्रायची चव तुम्ही नक्की चाखली पाहिजे.