IMF Warns Maldives: ऐका नाहीतर 'दिवाळखोर' व्हाल, चीनकडून कर्ज घेणाऱ्या मालदीवला IMF चा कडक इशारा

Bankrupt: मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मोइज्जू यांनी स्वतः संसदेत म्हटले आहे की, देशाची आर्थिक स्थिती डळमळीत असल्याने आपण नवीन विकास कामे करू शकत नाही.
India Maldives Row
India Maldives RowDainik Gomantak
Published on
Updated on

Will be 'bankrupt', IMF warns Maldives taking loans from China:

चीनच्या बळावर भारताशी पंगा घेणारा मालदीव चीनच्या कर्जाच्या जाळ्यात अडकत चालला आहे. परिस्थिती अशी आहे की, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मोइज्जू यांनी स्वतः संसदेत म्हटले आहे की, देशाची आर्थिक स्थिती डळमळीत असल्याने आपण नवीन विकास कामे करू शकत नाही.

दरम्यान, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या मालदीवला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने कडक इशारा दिला आहे. चीनकडून अब्जावधींचे कर्ज घेतलेल्या मालदीवला आयएमएफने कर्ज संकटाबाबत इशारा दिला आहे.

India Maldives Row
Pakistan Election 2024: निवडणुकीपूर्वी बॉम्बस्फोट, 12 ठार तर 30 हून अधिक जण जखमी

चीन आणि मालदीवची वाढती जवळीक पाहता आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने मोइज्जू प्रशासनाला 'कर्ज संकटा'चा इशारा दिला आहे. चीनकडून अब्जावधी डॉलर्सचे कर्ज घेतलेल्या मालदीवला सावध करताना IMFने मालदीवने आपले धोरण त्वरित बदलण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

भारतासोबतचे तणावपूर्ण संबंध असताना मालदीवने चीनकडून अब्जावधी रुपयांचे कर्ज घेतल्याचे IMFने म्हटले आहे. अशा स्थितीत हिंदी महासागरात सामरिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या या देशाने आपल्या धोरणांचा तातडीने पुनर्विचार करायला हवा.

India Maldives Row
Russia: रशियन महिलेने पतीच्या मृतदेहासोबत घालवली 4 वर्षे, मुलांना दिली धमकी; म्हणे केले महत्वाचे विधी

IMF ने मालदीवच्या अर्थव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर सांगितले की, मालदीवने महत्त्वपूर्ण धोरणात्मक बदल न केल्यास देशाची एकूण वित्तीय तूट आणि सार्वजनिक कर्ज उच्च राहण्याचा अंदाज आहे.

मालदीवच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग पर्यटन उद्योगावर आधारित आहे. अशा परिस्थितीत जेव्हा कोरोनाचा काळ संपला तेव्हा मालदीवचा पर्यटन उद्योग अडचणीतून सुटला, पण भारताशी पंगा घेतल्यानंतर भारतीय पर्यटकांनी मालदीववर बहिष्कार टाकला.

यानंतर मालदीवमधील पर्यटकांची संख्या कमी होऊ लागली आणि श्रीलंका पुढे सरकला. मालदीवच्या अर्थव्यवस्थेचा एक तृतीयांश भाग पर्यटनातून येतो. असे असतानाही देश चालवण्यासाठी चीनकडून अब्जावधी डॉलर्सचे कर्ज घ्यावे लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com