Russia: रशियन महिलेने पतीच्या मृतदेहासोबत घालवली 4 वर्षे, मुलांना दिली धमकी; म्हणे केले महत्वाचे विधी

Russia Crime News: रशियातील एका महिलेने तिच्या पतीच्या ममी केलेल्या मृतदेहासोबत सुमारे चार वर्षे घालवली आणि प्राचीन इजिप्शियन देवाच्या प्रेरणेने गूढ विधी केले, असे न्यूयॉर्क पोस्टने वृत्त दिले आहे.
Russia Crime News
Russia Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Russia Crime News:

रशियातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रशियातील एका महिलेने तिच्या पतीच्या ममी केलेल्या मृतदेहासोबत सुमारे चार वर्षे घालवली आणि प्राचीन इजिप्शियन देवाच्या प्रेरणेने गूढ विधी केले, असे न्यूयॉर्क पोस्टने वृत्त दिले आहे.

दरम्यान, चार मुलांची आई असलेल्या स्वेतलाना (50) या महिलेने तिचा पती व्लादिमीरच्या अवशेषांसह एक बेड शेअर केला आणि आपल्या मुलांना कोणालाही सांगू नका, अन्यथा त्यांना अनाथाश्रमात सोडण्याची धमकी दिली. न्यूज साइट 78.ru नुसार, डिसेंबर 2020 मध्ये घरगुती वादानंतर व्लादिमीरचा मृत्यू झाला. स्वेतलानाने तिचा पती जमिनीवर निपचित पडलेला पाहिला आणि तिला वाटले की तो नाटक करत आहे. काही तासांनंतरच तिच्या मोठ्या मुलीला काहीतरी गडबड असल्याचा संशय आला.

दरम्यान, स्वेतलानाने तिच्या पतीचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळला आणि त्याला तिच्या खोलीत नेले. त्यानंतर तिने आपल्या मुलांना त्यांच्या वडिलांबद्दल प्रश्न विचारण्यास मनाई केली असे एका अहवालात म्हटले आहे. दरम्यान, गेल्या गुरुवारी हे प्रकरण उघडकीस आले जेव्हा सामाजिक कार्यकर्ते स्वेतलानाच्या घरी पोहोचले.

Russia Crime News
Russia: रशियन ताब्यातील लिसिचान्स्क शहरातील बेकरीवर बेछूट गोळीबार; 28 जण ठार

दुसरीकडे, घराची झडती घेतली असता, पोलिसांना (Police) अनेक गूढ वस्तू सापडल्या, ज्यात ममी केलेल्या पतीच्या पायावर इजिप्शियन क्रॉस, टॅरो कार्ड, ताबीज आणि प्राण्यांच्या कवटीच्या प्रतिमा ठेवल्या होत्या. दुसरीकडे, व्लादिमीरला हेच हवे असेल असा दावा करुन तिने आपल्या पतीच्या शरीराचे जतन करण्यात मदत करण्यासाठी अनेक विधी केल्या. दरम्यान, स्वेतलानाला तिच्या पतीबद्दल विचारले असता, तिने लोकांना आणि शेजाऱ्यांना सांगितले की, तो तिबेटमध्ये (Tibet) वैद्यकीय उपचार घेत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Sesa workers indefinite protest Goa layoffs issue
Man Cuts Private Part Temple
Goa Drug Case
Mapusa POCSO Court Verdict
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com