Pakistan Election 2024: निवडणुकीपूर्वी बॉम्बस्फोट, 12 ठार तर 30 हून अधिक जण जखमी

Pakistan Election: पाकिस्तान निवडणुकीच्या एक दिवस आधी एका अपक्ष उमेदवाराच्या निवडणूक कार्यालयाबाहेर स्फोट झाला.
Explosion
ExplosionDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Election 2024:

पाकिस्तान निवडणुकीच्या एक दिवस आधी एका अपक्ष उमेदवाराच्या निवडणूक कार्यालयाबाहेर स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्याचवेळी, सुमारे 30 जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणुक पार पडणार आहे.

अनेक वाहने जळून खाक झाली

पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, बलुचिस्तानच्या (Balochistan) पिशीन जिल्ह्यातील नोकंडी भागात हा स्फोट झाला. येथून अस्फंद यार खान काकर हे अपक्ष उमेदवार आहेत. दुपारी त्यांच्या निवडणूक कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने लोक जमले होते. अचानक मोठा स्फोट होऊन आग भडकली. आरडाओरडा करत लोक सैरावैरा धावले. या स्फोटात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Explosion
Pakistan Election: पुन्हा पंतप्रधान होण्याचे स्पप्न भंगणार? Imran Khan यांचे उमेदवारी अर्ज दोन मतदारसंघातून फेटाळले

जवळच्या केंद्रांवरुन अग्निशमन दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या

दरम्यान, या घटनेनंतर घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या स्फोटाची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा NA-265 मध्ये हा स्फोट झाला.

सर्व जखमींना जवळच्या जिल्हा रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्याला आमचे प्राधान्य आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बचाव कार्यात पिशीन अग्निशमन केंद्राची वाहने कमी पडत होती. यानंतर जिल्हा प्रशासनाने बलुचिस्तानच्या इतर अग्निशमन केंद्रातून अग्निशमन दलाची गाडी मागवली आहे.

Explosion
Pakistan Election: हाफिज सईदची पार्टी लढवणार निवडणूक; दहशतवादी मुलगाही आजमावणार नशीब

निवडणूक जाहीर झाल्यानंतर हिंसक घटनांमध्ये वाढ

पाकिस्तानमध्ये निवडणुका जाहीर झाल्यापासून हिंसक घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यापूर्वी, कराची आणि बलुचिस्तानमधील दहशतवादी संघटनांनी येथील निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला लक्ष्य केले होते. या ठिकाणी कार्यालयाच्या भिंतींवर स्फोट घडवून आणण्यात आले. हे स्फोट केवळ घाबरवण्यासाठी असले तरी तपासादरम्यान त्यात बॉल बेअरिंग आढळले नाहीत. स्फोटाची प्राणघातकता वाढवण्यासाठी आणि अधिक लोकांना दुखापत करण्यासाठी बॉल बेअरिंग किंवा पेलेटचा वापर केला जातो.

पाकिस्तान निवडणुकीशी संबंधित

विधानसभा निवडणुकीत 12 कोटींहून अधिक मतदार मतदान करणार आहेत.

निवडणुकीच्या मैदानात 5121 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

निवडणुकीत 4807 उमेदवार पुरुष, 312 महिला आणि 2 ट्रान्सजेंडर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com