VIDEO: हातात बेड्या अन् चेहऱ्यावर स्मितहास्य, व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात; पहिला व्हिडिओ आला समोर

Venezuela President Nicolas Maduro Arrest Video: व्हेनेझुएलाचे शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकन विशेष दलाने एका गुप्त कारवाईत अटक केली
Venezuela President Nicolas Maduro Arrest Video
Venezuela President Nicolas Maduro Arrest VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Venezuela President Nicolas Maduro: जागतिक राजकारणातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली. व्हेनेझुएलाचे शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकन विशेष दलाने एका गुप्त कारवाईत अटक केली असून त्यांना हातबेड्या घालून अमेरिकेत नेण्यात आले. अटकेनंतरचा मादुरो यांचा पहिला व्हिडिओ आता समोर आला असून यामध्ये ते न्यू यॉर्कमधील अमेरिकन ड्रग्ज एन्फोर्समेंट ॲडमिनिस्ट्रेशन (DEA) च्या मुख्यालयात अधिकाऱ्यांच्या पहाऱ्यात चालताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत 63 वर्षीय निकोलस मादुरो काळ्या रंगाचे हुडी असलेले स्वेटशर्ट परिधान केलेले दिसत आहेत. त्यांच्या हातामध्ये हातबेड्या असून 'DEA NYD' असे लेबल असलेल्या निळ्या रंगाच्या गालिचा असलेल्या कॉरिडॉरमधून त्यांना नेले जात आहे. विशेष म्हणजे, इतक्या गंभीर परिस्थितीतही मादुरो तेथील अधिकाऱ्यांना 'गुड नाईट' आणि 'हॅप्पी न्यू इयर' म्हणताना ऐकू येत आहेत. हा व्हिडिओ सध्या जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Venezuela President Nicolas Maduro Arrest Video
Donald Trump Warship: ट्रम्पचा धमाका! तयार करणार जगातील सर्वात मोठी युद्धनौका; वाचा थरकाप उडवणारी माहिती

धाडसी 'ऑपरेशन काराकास'

शनिवारी पहाटे व्हेनेझुएलाची राजधानी काराकास येथे अमेरिकन स्पेशल फोर्सेसने ही मोठी कारवाई केली. मादुरो हे काराकास येथील हाय-सिक्युरिटी असलेल्या 'फोर्ट टियूना' लष्करी संकुलातील आपल्या निवासस्थानी झोपलेले असताना अमेरिकन सैन्याने अचानक हल्ला केला. जेव्हा मादुरो यांना या हल्ल्याची चाहूल लागली, तेव्हा त्यांनी लोखंडी भिंती असलेल्या एका सुरक्षित खोलीत लपण्याचा प्रयत्न केला, परंतु अमेरिकन कमांडोंनी त्यांना आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना ताब्यात घेतले. त्यांना सुरुवातीला एका लष्करी तळावर नेण्यात आले आणि त्यानंतर विमानाने न्यू यॉर्कला हलवण्यात आले.

Venezuela President Nicolas Maduro Arrest Video
Donald Trump: टॅरिफमुळे अमेरिका बनला जगातील 'सर्वात श्रीमंत देश', डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा; म्हणाले, 'प्रत्येक नागरिकाला 2000 डॉलर देणार...'

गंभीर आरोप आणि तुरुंगवास

निकोलस मादुरो यांच्यावर अमेरिकेने अतिशय गंभीर आरोप ठेवले आहेत. अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर कोकेनची तस्करी करणे आणि बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे या आरोपांचा समावेश आहे. अमेरिकेच्या मते, मादुरो यांनी आपल्या सत्तेचा वापर करुन अंमली पदार्थांच्या व्यापाराला खतपाणी घातले. आता मादुरो यांची रवानगी ब्रुकलिनमधील कुख्यात 'मेट्रोपॉलिटन डिटेंशन सेंटर' (MDC) या फेडरल तुरुंगात केली जाणार आहे. हे तेच तुरुंग आहे, जिथे गेल्या वर्षी प्रसिद्ध रॅपर शॉन 'डिडी' कॉम्ब्स याला ठेवण्यात आले होते. या तुरुंगात कडक सुरक्षा व्यवस्था असून मादुरो यांच्यावर आता अमेरिकन कायद्यानुसार खटला चालवला जाईल.

Venezuela President Nicolas Maduro Arrest Video
Donald Trump Dance: मलेशियात उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका! सोशल मीडियावर 'तो' भन्नाट डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल; तुम्ही पाहिलाय का? VIDEO

जागतिक परिणाम

व्हेनेझुएलासारख्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाला अशा प्रकारे अटक करणे ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची एक मोठी घटना मानली जात आहे. या कारवाईमुळे दक्षिण अमेरिकेतील (America) राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. व्हेनेझुएलामध्ये या अटकेनंतर संतापाची लाट असून अमेरिकेच्या या कृतीला 'सार्वभौमत्वावर हल्ला' म्हटले जात आहे. मात्र, अमेरिकेने स्पष्ट केले की, ड्रग्ज तस्करी आणि गुन्हेगारी कारवायांविरुद्धचा हा मोठा लढा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com