Taliban Meeting: तालिबानने बोलावलेल्या बैठकीत भारताचा सहभाग, रशियासह इतर दहा देशांनी लावली हजेरी

India-Taliban: भारत सरकारने अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारला मान्यता दिलेली नाही. मात्र या बैठकीनंतर तालिबानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे उपप्रवक्ते हाफिज झिया अहमद म्हणाले की, भारताचा आम्हाला पाठिंबा आहे.
India attends meeting organised by Taliban
India attends meeting organised by TalibanDainik Gomantak
Published on
Updated on

The meeting convened by the Taliban was attended by India and ten other countries including Russia:

अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने बोलावलेल्या बैठकीत भारतही सहभागी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालिबानच्या परराष्ट्र मंत्रालयाने अनेक देशांच्या प्रतिनिधींना आमंत्रित केले होते.

सोमवारी झालेल्या या बैठकीत भारताव्यतिरिक्त रशिया, चीन, इराण, पाकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, कझाकिस्तान, तुर्कस्तान आणि इंडोनेशियाचे राजनैतिक अधिकारी सहभागी झाले होते. रशियाचे प्रतिनिधित्व अफगाणिस्तानसाठीचे विशेष प्रतिनिधी झामिर काबुलोव्ह यांनी केले.

काबूलमध्ये झालेल्या या बैठकीबाबत भारतीय अधिकाऱ्यांकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

यापूर्वी, अफगाणिस्तानचे कार्यवाहक राजदूत बद्रुद्दीन हक्कानी यांना संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील भारतीय दूतावासाने अबू धाबी येथे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी आमंत्रित केले होते.

भारत सरकारने अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारला मान्यता दिलेली नाही. मात्र या बैठकीनंतर तालिबानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे उपप्रवक्ते हाफिज झिया अहमद म्हणाले की, भारताचा आम्हाला पाठिंबा आहे.

India attends meeting organised by Taliban
Iran-Pakistan Tension: एअर स्ट्राइकनंतर 'पेनल्टी स्ट्राइक' च्या तयारीत इराण; पाकिस्तानकडे करणार कोट्यवधींची मागणी

तालिबानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या उप प्रवक्त्याने या बैठकीत सहभागी झालेल्या भारतीय प्रतिनिधीच्या हवाल्याने सांगितले की, “भारत अफगाणिस्तानच्या स्थिरतेवर केंद्रित असलेल्या सर्व उपक्रमांना समर्थन देतो. भारत अफगाणिस्तानच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक उपक्रमांमध्ये सक्रियपणे भाग घेतो आणि अफगाणिस्तानच्या स्थैर्य आणि विकासासाठी प्रत्येक प्रयत्नांना पाठिंबा देतो," अहमद यांनी X वर एका पोस्टमध्ये भारतीय प्रतिनिधीचा हवाला दिला आहे.

India attends meeting organised by Taliban
Maldives President Mohamed Muizzu: चीनधार्जिण्या मोइज्जूंना विरोधक दाखवणार 'इंगा'; लवकरच सुरु करणार सत्तेतून हाकलण्याची प्रक्रिया!

तालिबानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, अफगाणिस्तान या भागातील देशांशी संबंधांना महत्त्व देतो आणि या देशांनी अफगाणिस्तानशी सकारात्मक संवाद वाढवण्यासाठी आणि पुढे चालू ठेवण्यासाठी प्रादेशिक संवाद आयोजित केला पाहिजे.

परराष्ट्र मंत्री अमीरखान मोट्टाकी म्हणाले की, मला स्पष्टपणे सांगायचे आहे की, अफगाणिस्तानला इतर देशांप्रमाणेच समस्या आहेत. जवळपास अर्ध्या शतकापासून हा देश व्याप, परकीय हस्तक्षेप आणि गृहयुद्धाने ग्रासला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com