Ram Mandir: राम मंदिरासाठी थायलंड पाठवणार 'विशेष भेट', जाणून घ्या या देशाचा प्रभू श्रीरामाशी काय आहे संबंध?

Ayodhya: अयोध्येतील रामजन्मभूमी येथील श्री राम मंदिराच्या उद्घाटनाची सर्व तयारी जोरात सुरू आहे. 24 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराचे भव्य उद्घाटन होणार आहे. यासाठी अनेक देशांतून खास गोष्टी आल्या आहेत.
Ram Mandir
Ram Mandir Dainik Gomantak
Published on
Updated on

Special soil is being sent as a gift from Thailand before the inauguration of the Ram temple:

अयोध्येतील रामजन्मभूमी येथील श्री राम मंदिराच्या उद्घाटनाची सर्व तयारी जोरात सुरू आहे. 24 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराचे भव्य उद्घाटन होणार आहे.

यासाठी अनेक देशांतून खास गोष्टी आल्या आहेत. नेपाळच्या खास नद्यांमधून दगड आले आहेत. याच क्रमाने थायलंडनेही दोन नद्यांचे पाणी पाठवले आहे. मात्र यावेळी राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी थायलंडहून खास माती भेट म्हणून पाठवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राम मंदिरासाठी थायलंडहून माती पाठवण्याच्या मुद्द्यावर विश्व हिंदू परिषद (VHP) थायलंड चॅप्टरचे अध्यक्ष सुशील कुमार सराफ यांनी माहिती दिली की, आम्ही माती अयोध्येत नेण्यासाठी गोविंद ब्रिज महाराज यांच्याकडे सोपवणार आहोत.

यापूर्वी थायलंडनेही राम मंदिरासाठी मातीपूर्वी दोन नद्यांचे पाणी पाठवले होते. थायलंडपूर्वी जगातील सुमारे १५५ देशांतून पाणी आले होते. यामध्ये फिजी, मंगोलिया, डेन्मार्क, भूतान, रोमानिया, हैती, ग्रीस, कोमोरोस, काबार्डे, मॉन्टेनेग्रो, तुवालू, अल्बेनिया आणि तिबेट या देशांचा समावेश आहे.

Ram Mandir
Saudi Arabia: सौदी अरेबियाने परदेशी कामगारांसाठी व्हिसा नियम केले कडक, भारतावरही होणार परिणाम?

थायलंडमधील विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष सुशील कुमार सराफ म्हणाले की, थायलंडचे भारतासोबत खोल सांस्कृतिक संबंध आहेत आणि ते अधिक दृढ होतील.

सुशील कुमार सराफ हे थायलंडचे प्रख्यात व्यापारी आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांनी सांगितले की, आम्ही बँकॉकमध्ये श्री राम मंदिराची प्रतिकृती बनवली आहे, जेणेकरून लोकांना दर्शन घेता येईल. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनासाठीही आम्हाला निमंत्रित करण्यात आले आहे.

Ram Mandir
Gurpatwant Singh Pannun: दहशतवादी पन्नूला मृत्यूची भीती; बायडन प्रशासनाकडे केली सुरक्षेची याचना!

भारत आणि थायलंड यांच्यातील सांस्कृतिक (Culture) नात्याबद्दल बोलताना सराफ म्हणाले की, इथल्या प्रत्येक घरात तुम्हाला गणेशाची मूर्ती पाहायला मिळेल. येथील अनेक मंत्रालयांचे लोगो हिंदू चिन्हांसारखे आहेत. गरुडजी हे त्यांच्या अनेक विभागांचे प्रतीक आहेत. ब्रह्मदेवाचे दर्शन घेण्यासाठी विविध देशांतून लोक येतात.

थायलंडमध्ये (Thailand) स्थायिक होण्याबाबत बोलताना ते म्हणाले की, थायलंड हे हिंदूंसाठी चांगले ठिकाण आहे. येथे राम वंशाचे राज्य आहे. आपण रामराज्याबद्दल बोलतो. ते येथे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com