Gurpatwant Singh Pannun: दहशतवादी पन्नूला मृत्यूची भीती; बायडन प्रशासनाकडे केली सुरक्षेची याचना!

Gurpatwant Singh Pannun: भारताविरोधात फुटीरतावादी मोहीम छेडणारा खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूला आता हत्येची भीती भेडसावत आहे.
SFJ Chief Gurpatwant Singh Pannun UTurn
SFJ Chief Gurpatwant Singh Pannun UTurnDainik Gomantak
Published on
Updated on

Gurpatwant Singh Pannun: भारताविरोधात फुटीरतावादी मोहीम छेडणारा खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूला आता हत्येची भीती भेडसावत आहे. याचा संदर्भ देत पन्नू बायडन प्रशासनाकडे आपल्या सुरक्षेची याचना करत आहेत. टाईम मासिकाला दिलेल्या मुलाखतीत, शीख फॉर जस्टिसच्या प्रमुखाने आरोप केला की, भारत सरकार त्याची हत्या करु इच्छित आहे. पन्नू पुढे म्हणाला की, हे अमेरिकन सार्वभौमत्वाला आव्हान आहे. अमेरिकेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीला हा धोका आहे.

एअर इंडियाच्या धोक्याबाबत स्पष्टीकरण

मुलाखतीदरम्यान पन्नूने एअर इंडियाला दिलेल्या धमकीवरही स्पष्टीकरण दिले. त्याला विचारण्यात आले की, त्याने शीखांना एअर इंडियाच्या विमानातून उड्डाण करण्याबाबत चेतावणी दिली होती का? यावर खलिस्तानी दहशतवादी पन्नू म्हणाला की, मी एअर इंडियावर बहिष्कार घालू म्हणत होतो. परंतु लोकांनी याचा गैरसमज करुन घेतला. तो पुढे म्हणाला की, लोक बहिष्कार घालणे आणि बॉम्ब टाकणे यात फरक कसा करु शकत नाहीत? एअर इंडियाला धमकीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पन्नूवर दहशतवाद आणि कटाचे आरोप लावण्यात आले आहेत.

SFJ Chief Gurpatwant Singh Pannun UTurn
SFJ Chief Gurpatwant Singh Pannun UTurn: ''मी एअर इंडियावर बहिष्कार टाकण्याबाबत....'', गुरपतवंत सिंग पन्नूचा यूटर्न

स्वतःला लक्ष्य बनवण्यावर...

G20 परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि बायडन यांच्यात त्याला लक्ष्य करण्यात आल्याच्या प्रश्नालाही पन्नूने उत्तर दिले. तुला यासंबंधी माहिती होती का, असे विचारण्यात आले. यावर पन्नू म्हणाला की, मोदी सरकारला मला मारायचे असून हे माझे अधिकृत वक्तव्य आहे. जनमतसंग्रह मोहीम चालवल्याबद्दल त्यांना मला संपवायचे आहे. गेल्या आठवड्यात भारताने म्हटले होते की, संघटित गुन्हेगार, दहशतवादी यांच्या संगनमताची महत्त्वाची माहिती अमेरिकेने दिली आहे.

SFJ Chief Gurpatwant Singh Pannun UTurn
Hardeep Singh Nijjar Murder: 'तपासाविनाच भारताला दोषी ठरवले...', भारतीय राजदूतांनी कॅनडाला दिले चोख प्रत्युत्तर

बायडन प्रशासनाने पुष्टी केली

पन्नूला अमेरिकेच्या भूमीवर मारायचे आहे असे वृत्त फायनान्शिअल टाईम्सने दिले होते. बायडन प्रशासनाने देखील पुष्टी केली की, अमेरिकेने वरिष्ठ स्तरावर भारताकडे चिंता व्यक्त केली आहे. याला जबाबदार असणार्‍यांना जबाबदार धरले जाईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, जेव्हा हा मुद्दा उपस्थित केला गेला तेव्हा भारत चकित आणि चिंतेत होता. हे सरकारचे धोरण नसून आपण या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे भारताने अमेरिकेला सांगितले. परराष्ट्र मंत्रालयाची ही टिप्पणी लंडनस्थित वृत्तपत्राच्या बातमीला प्रतिसाद म्हणून आली. ज्यात असे म्हटले होते की, अमेरिकेने भारताला पन्नूच्या हत्येच्या कटात सामील होण्याविरुद्ध इशारा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Jaish-e-Mohammed commander killed by unknown gunmen in Pakistan
Terrorist Secret Communication
Virendra Singh Baisoya Drug Mafia Deported Dubai
Gulveer Singh celebrating after winning the 10,000m silver medal at Commonwealth Games 2026
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com