29 वर्षीय पॅरालिम्पिक ॲथलीटने होणाऱ्या बायकोसह 4 जणांची केली हत्या; नंतर स्वत:वर झाडली गोळी

Thailand Crime: थायलंडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Thailand Crime
Thailand CrimeDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Thailand Crime: थायलंडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका लग्न समारंभात नवरदेवाला इतका राग आला की त्याने थेट 4 जणांची गोळ्या झाडून हत्या केली. एवढेच नाही तर त्याने यामध्ये होणाऱ्या बायकोचीही हत्या केली आणि नंतर स्वतःवरही गोळी झाडली.

बीबीसीच्या वृत्तानुसार, थायलंडमधील वांग नाम खियो जिल्ह्यात शनिवारी (25 नोव्हेंबर) ही घटना घडली. बँकॉक पोस्टच्या रिपोर्टनुसार, 29 वर्षीय माजी सैनिक आणि पॅरालिम्पिक ॲथलीट चातुरोंग साकसुक लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होता.

तो 44 वर्षीय गर्लफ्रेंड कंचना पाचुनथुएकसोबत तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होता. यानंतर दोघांनी लग्न (Marriage) करण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, शनिवारी दोघांचा विवाहसोहळा पार पडला. नवरदेव चातुरोंग साकसुक घटनास्थळावरुन निघून गेला आणि काही वेळाने पिस्तुल घेऊन लग्नाच्या ठिकाणी आला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, त्याच्या होणाऱ्या बायकोसोबत काही वैयक्तिक कारणावरुन वाद झाला होता.

यानंतर तो ताबडतोब त्याच्या कारजवळ गेला आणि तिथून पिस्तूल आणले. त्यानंतर त्याने नवरीसह 4 जणांवर गोळ्या झाडल्या, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. एवढेच नाही तर लोक त्याला रोखेपर्यंत त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतली. या अपघातामुळे आनंदाचे वातावरण शोकात बदलले.

Thailand Crime
Thailand: थायलंडमध्ये मोठ्या जुगार रॅकेटचा पर्दाफाश, 80 भारतीयांना अटक

दुसरीकडे, नवरदेवाने केवळ गर्लफ्रेंड कंचनाच नाही तर तिची 62 वर्षीय आई आणि 38 वर्षीय बहिणीलाही गोळ्या घातल्या. त्याने दोन पाहुण्यांवरही गोळ्या झाडल्या, ज्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी आहे. यानंतर त्यानेही स्वतःवर गोळी झाडली. त्याचाही तात्काळ मृत्यू झाला.

घटनास्थळावरुन 11 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, लग्नाच्या सुरुवातीपासून नवरदेवाला एका गोष्टीचा राग होता. मात्र, त्याला राग कशामुळे आला आणि ही घटना कोणत्या कारणांमुळे घडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस (Police) घटनास्थळावरुन पुरावे गोळा करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Indian Expat Murdered In Sharjah UAE
Mahikavati Bakhar History
Guwahati Crime News
America Double Murder Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com