मैत्री: भारत-नेपाळ पुन्हा एकत्र, जयनगर ते कुर्था दरम्यान रेल्वे सुरु

चीन (China) आपल्या आर्थिक विस्तारवादी नितीचा अवलंब करत सुटला आहे.
Prime Minister Narendra Modi & Sher Bahadur Deuba
Prime Minister Narendra Modi & Sher Bahadur DeubaDainik Gomantak
Published on
Updated on

चीन आपल्या आर्थिक विस्तारवादी नितीचा अवलंब करत सुटला आहे. याच विस्तारवादाच्या माध्यमातून चीनने नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका या भारताशेजारील देशांवर अधिपत्य गाजवण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे श्रीलंकेतील (Sri Lanka) हंबनटोटा बंदरावर चीनने आर्थिदृष्ट्या कब्जा केला. याच पाश्वभूमीवर काही काळ संबंध चिघळल्यानंतर आता भारत (India)- नेपाळ (Nepal) संबंधात गोडवा विरघळू लागला आहे. (Rupee Card in Nepal and train service from Jayanagar in India to Kurtha in Nepal has been started)

दरम्यान, तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आलेले नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा (Sher Bahadur Deuba) यांनी शनिवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्याशी चर्चा केली. यानंतर दोन्ही नेत्यांनी नेपाळमध्ये रुपे कार्ड आणि भारतातील जयनगर ते नेपाळमधील कुर्थापर्यंत रेल्वे सेवा सुरु केली. पीएम मोदी आणि पंतप्रधान देउबा यांनी संयुक्तपणे रुपे कार्ड आणि ट्रेन सेवा सुरु केली. जयनगर-कुर्था रेल्वे मार्ग भारताच्या मदतीने विकसित करण्यात आला आहे. पीएम मोदी आणि नेपाळचे पीएम देउबा यांनी नेपाळमधील सोलू कॉरिडॉर 132 केव्ही पॉवर ट्रान्समिशन लाइन आणि सबस्टेशनचे संयुक्तपणे उद्घाटन केले आहे.

Prime Minister Narendra Modi & Sher Bahadur Deuba
''...काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पाकिस्तान तयार''

संबंधाचा नवा अध्याय सुरु झाला: पंतप्रधान मोदी

यावेळी पीएम मोदी म्हणाले की, 'नेपाळमध्ये रुपे कार्ड सुरु केल्याने आपल्या अर्थव्यवस्थेच्या कनेक्टिव्हिटीमध्ये एक नवीन अध्याय जोडला जाईल. नेपाळ पोलीस अकादमी, नेपाळगंज येथील ई-इंटिग्रेटेड चेक पोस्ट, रामायण सर्किट इत्यादी इतर प्रकल्पही दोन्ही देशांना जवळ आणतील.' मोदी पुढे म्हणाले की, ''मी आणि पंतप्रधान देउबा यांनी सर्व बाबतीत व्यापार आणि सीमापार कनेक्टिव्हिटीला प्राधान्य देण्याचे मान्य केले आहे. जयनगर-कुर्था रेल्वे मार्गाची सुरुवात हा त्याचाच एक भाग आहे. अशा योजना दोन्ही देशांमधील लोकांच्या सुरळीत, त्रासमुक्त देवाणघेवाणीसाठी मोठे योगदान देतील.''

मोदी म्हणाले की, 'नेपाळ आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा सदस्य बनल्याने आम्हाला विशेष आनंद आहे. यामुळे आपल्या प्रदेशात शाश्वत, किफायतशीर आणि स्वच्छ ऊर्जेला चालना मिळेल. भारतीय कंपन्यांनी नेपाळच्या जलविद्युत विकास प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग घेण्यासही सहमती दर्शवली आहे.' पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''देउबाजी हे भारताचे जुने मित्र आहेत. भारत-नेपाळ संबंधांच्या विकासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आपण अनादी काळापासून सुख-दुःखाचे सोबती आहोत. नेपाळच्या शांतता, प्रगती आणि विकासाच्या प्रवासात भारत हा खंबीर भागीदार आहे.''

Prime Minister Narendra Modi & Sher Bahadur Deuba
युक्रेनमधून भारतीयांना काढण्यासाठी 'Air Force' उतरणार मैदानात

संयुक्त निवेदनात देउबा म्हणाले - नेपाळी लोकांप्रती असलेल्या आपुलकीचे मी कौतुक करतो

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान देउबा यांनी संयुक्त निवेदनही जारी केले. यामध्ये देउबा म्हणाले, 'नेपाळ आणि नेपाळी लोकांबद्दलचे तुमचे प्रेम आणि आपुलकी मला खूप आवडते. आणि विशेष म्हणजे आमची ही भेट दोन्ही देशांना प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारी ठरेल. देउबा पुढे म्हणाले की, ''भारत-नेपाळ संबंधांच्या विविध पैलूंवर आज आमच्यात मैत्रीपूर्ण चर्चा झाली. मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्यासाठी आम्ही आमचे दृष्टिकोन सामायिक केले आहेत. पंतप्रधान मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताच्या प्रगतीची मी कामना करतो. कोरोना संकटादरम्यान भारताचे प्रभावी व्यवस्थापन आम्ही पाहिले आहे. भारताकडून प्राथमिक लस समर्थनाव्यतिरिक्त कोरोनाशी लढण्यासाठी औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि रसद प्राप्त झाली.''

Prime Minister Narendra Modi & Sher Bahadur Deuba
UNSC मध्ये अफगाणिस्तान प्रश्नावर भारताने स्पष्ट केली भूमिका

नेपाळमधील जनकपूरमधील मधुबनीमधील जयनगर, कुर्था स्टेशन

भारत आणि नेपाळ दरम्यानची रेल्वे सेवा बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील जयनगर स्थानकापासून नेपाळमधील जनकपूरमधील कुर्था स्थानकापर्यंत असणार आहे. जयनगर-कुर्था विभाग हा 68.7 किमी लांबीच्या बिजलपूर-बर्दीदास रेल्वे लिंकचा भाग आहे. हे भारत सरकारच्या 8.77 अब्ज नेपाळी रुपयांच्या अनुदानात बांधले जात आहे.

याआधी देउबा आणि पीएम मोदी यांच्यात दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये भेट झाली होती. ज्यामध्ये दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांना नवा आयाम देण्याचा विचार केला. देउबा हे भारताचे मित्र मानले जातात. देउबा यांनी नेपाळच्या संसदेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांचे अभिनंदन केले होते. यानंतर 19 जुलै 2019 रोजी दोन्ही नेत्यांमध्ये फोनवर चर्चा झाली. नोव्हेंबर 2021 मध्ये ग्लासगोमध्ये COP 26 च्या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांची भेट झाली.

Prime Minister Narendra Modi & Sher Bahadur Deuba
Mali: सालेहमध्ये माली लष्करांची मोठी कारवाई, 203 दहशतवाद्यांचा केला खात्मा

दरम्यान, तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर देउबा शुक्रवारी दिल्लीत पोहोचले आहेत. संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी देउबा यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली. जयशंकर यांच्यासोबतच्या बैठकीत दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या गरजेवर भर दिला.

Prime Minister Narendra Modi & Sher Bahadur Deuba
भारत-ऑस्ट्रेलियाची 'अंतरिम' व्यापार करारावर स्वाक्षरी

देउबा उद्या वाराणसीला जाणार

तत्पूर्वी, पंतप्रधान देउबा आणि त्यांची पत्नी डॉ. आरजू देउबा दिल्लीला पोहोचल्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट करत म्हटले की, 'खास मित्राचे हार्दिक स्वागत.' या दौऱ्यात देउबा रविवारी सकाळी 9 वाजता वाराणसीला पोहोचतील. तेथील अनेक मंदिरांना भेटी दिल्यानंतर ते दुपारी दिल्लीला परततील. 4.15 वाजता दिल्लीहून काठमांडूला रवाना होणार आहेत.

नेपाळचे पंतप्रधान तीन वर्षानंतर भारत दौऱ्यावर आले

देउबा हे तीन वर्षांत भारताला भेट देणारे पहिले नेपाळचे पंतप्रधान आहेत. त्यांच्या आधी, मे 2019 मध्ये, नेपाळचे तत्कालीन पंतप्रधान केपी शर्मा ओली हे नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत असताना भारतात आले होते. त्यापूर्वी काही महिने पंतप्रधान मोदी बिमस्टेक परिषदेत सहभागी होण्यासाठी काठमांडूला गेले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com