भारत-ऑस्ट्रेलियाची 'अंतरिम' व्यापार करारावर स्वाक्षरी

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान अंतरिम व्यापार करारावर स्वाक्षरी, पीएम मोदी म्हणाले - द्विपक्षीय संबंधांसाठी एक ऐतिहासिक क्षण
India-Australia
India-Australia Dainik Gomantak
Published on
Updated on

भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील अंतरिम व्यापार करारावर स्वाक्षरी झाली आहे. या स्वाक्षरीमुळे, कापड, चामडे, फर्निचर, दागिने आणि यंत्रसामग्रीसह 6,000 हून अधिक क्षेत्रांतील भारतीय निर्यातदारांना ऑस्ट्रेलियन बाजारपेठेत त्वरित शुल्कमुक्त प्रवेश मिळणार आहे. (India-Australia sign interim trade agreement)

India-Australia
पाडव्याच्या शुभेच्छा देत सेनेचा केंद्राला टोला

भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारावरील आभासी स्वाक्षरी समारंभात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) म्हणाले की, भारत-ऑस्ट्रेलिया हे भागीदार आहेत, लोकशाही, कायद्याचे राज्य आणि पारदर्शकता या सामायिक मूल्यांनी एकत्र आल्याचे दिसून येते. 2 भावांप्रमाणे या 2 राष्ट्रांनीही महामारीत एकमेकांना साथ दिली.

त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm-narendra-modi) म्हणाले की, 'हे संबंध भारत-ऑस्ट्रेलिया मैत्रीचे महत्त्वाचे स्तंभ आहेत, या करारामुळे विद्यार्थी, व्यावसायिक आणि पर्यटकांची देवाणघेवाण सुलभ होऊ शकते आणि त्यामुळेचे दोन्हीं देशांमधील संबंध आणखी घट्ट होतील.

India-Australia
समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता द्या : सुप्रिया सुळे

द्विपक्षीय संबंधांसाठी खरोखरच एक ऐतिहासिक क्षण,

या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांमधील संबंधांबद्दल बोलताना सांगितले की, 'एवढ्या कमी वेळेत एवढ्या महत्त्वाच्या करारावर दोन्ही देशांमध्ये किती परस्पर विश्वास आहे, हे सहज दिसून येते. आमच्या द्विपक्षीय संबंधांसाठी हा खरोखर ऐतिहासिक क्षण झाला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया संबंध हा मैत्रीचा आधारस्तंभ असल्याचे ते यावेळी म्हणाले. या करारामुळे विद्यार्थी, व्यावसायिक आणि पर्यटक यांच्यातील देवाणघेवाण सुलभ होऊ शकतो आणि संबंध ही अधिक घट्ट होतील.

अनेक वस्तू भारतीय निर्यातदारांसाठी शून्य आयात शुल्कावर उपलब्ध असणार,

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शनिवारी आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. आता केंद्रीय मंत्रिमंडळ आणि ऑस्ट्रेलियाच्या संसदेकडून मंजुरी मिळाल्यानंतर हा करार परस्पर तारखेला लागू होणार आहे. सूत्रांनी सांगितले की, अंतरिम करार अंमलात येण्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय निर्यातदारांना शून्य आयात शुल्कावर अनेक वस्तू उपलब्ध होणार आहेत.

India-Australia
केंद्र सरकारचे पाच माजी मंत्री बदलणार पत्ता, सरकारी बंगला सोडणार

त्यात असे म्हटले की ऑस्ट्रेलिया पहिल्या दिवसापासून भारताला निर्यातीच्या मूल्याच्या सुमारे 96.4 टक्के शून्य शुल्क देऊ करत आहे. यामध्ये सध्या ऑस्ट्रेलियामध्ये चार ते पाच टक्के सीमाशुल्क आकारणाऱ्या अनेक उत्पादनांचा समावेश असणार आहे. दुसरीकडे, भारत आपल्या 'टेरिफ लाइन'च्या 70 टक्क्यांहून अधिक ऑस्ट्रेलियासाठी शून्य शुल्क ऑफर करणार आहे. यामध्ये कोळशासारख्या उत्पादनांचा देखील समावेश असेल. ऑस्ट्रेलियातून होणाऱ्या आयातीपैंकी 74 टक्के कोळशाचा वाटा आहे तर सध्या त्यावर 2.5 टक्के शुल्क आकारले जाते आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com