अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) सुरु असलेल्या अराजकतेवर संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतता परिषदेत (UNSC) भारताने (India) आपली भुमिका स्पष्ट केली आहे. यावेळी भारताचे प्रतिनीधी टी.एस. तीरमुर्ती (TS Tirmurti) यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे त्याठीकाणच्या लहान मुलं आणि महिलांबद्दल काळजी व्यक्त केली आहे. “भारताला संपूर्ण जगात शांतता हवी आहे” अशी भुमिका परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षा लेखी यांनी सोमवारी अफगाणिस्तानमधील घडामोडींवर बोलताना व्यक्त केली. तसेच अफगाणिस्तानातील हिंदु आणि शीख नागरिकांना भारतात येण्यास पुर्ण मदत केली जाईल असे सांगितले आहे.
काबुलमधील हमीद करझाई आंतरपराष्ट्रीय विमानतळावरील काही विदारक दृष्य आम्ही पाहिले असुन ही परिस्थिती चिंताजनक असल्याचे मत भारताचे प्रतिनीधी टी.एस. तीरमुर्ती यांनी संयुक्त राष्ट्राच्या शांतता परिषदेत व्यक्त केले आहे.
अफगाणिस्तानची चिघळत जाणारी परिस्थिती पाहता जगातील अनेक देशांनी आपापल्या नागरिकांना अफगाणिस्तानमधुन बाहेर काढण्यासाठी पुर्ण प्रयत्न केले आहेत. अशातच आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील आपली भुमिका स्पष्ट केली आहे. ‘गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानमधील परिस्थिती अतिशय वेगाने बदलत आहे. भारत सरकार अफगाणिस्तानमधील घडामोडींवर बारीक नजर ठेवून आहे.
आम्ही तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी सातत्याने सूचना जारी करत आहोत, ज्यामाध्यमातुन त्यांना परत येण्याचे आवाहन केले आहे. तसेच ज्यांना परतायचे आहे त्यांच्याही संपर्कात आहोत’, असे सांगितले आहे. तसेच भारत कोणत्याही प्रकारचा दहशतवाद सहन करणार नाही अशी स्पष्ट भुमिका भारताने घेतल्याचे पहायला मिळाले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, ‘आम्ही अफगाणिस्तानमधील शीख आणि हिंदू समाजाच्या प्रतिनिधींच्या संपर्कात आहे. ज्यांना भारतात यायचे आहे त्यांना आम्ही मदत करू. तिथे असे अनेक अफगाणी नागरिक देखील आहेत जे आमच्या चांगल्या कामांमध्ये सहभागी होते, आम्ही त्यांनाही पाठिंबा देऊ.’ काबूलमधील व्यावसायिक कामकाज आज स्थगित करण्यात आले, ज्यामुळे आमच्या परतीच्या कामावर परिणाम झाला.
आता सर्वजण फ्लाइट पुन्हा सुरू होण्याची वाट पाहत आहेत. अफगाणिस्तानमधील परिस्थितीचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. अफगाणिस्तानातील भारतीय नागरिक आणि हितसंबंधांच्या संरक्षणासाठी भारत सरकार प्रत्येक पाऊल उचलेल अशी भुमिका परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.