''...काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पाकिस्तान तयार''

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा (General Qamar Javed Bajwa) यांनी इस्लामाबाद सुरक्षा संवादाच्या मंचावरुन मोठे वक्तव्य केले आहे.
Pakistan's Army Chief General Bajwa
Pakistan's Army Chief General Bajwa Dainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तानमधील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा (General Qamar Javed Bajwa) यांनी इस्लामाबाद सुरक्षा संवादाच्या मंचावरुन मोठे वक्तव्य केले आहे. बाजवा म्हणाले की, ''पाकिस्तान (Pakistan) सर्व विवाद सोडवण्यासाठी आणि पुन्हा नव्याने संबंध प्रस्थापित करण्यासाठी तयार आहे. त्यात काश्मीर वादाचाही समावेश आहे. दुसरीकडे भारतही संबंध सुधारण्यासाठी एक पाऊल उचलण्यास तयार असेल तर आम्हीही या मुद्द्यावर पुढे जाण्यास तयार आहोत.'' (Pakistan's Army Chief General Bajwa says if India shows readiness we are ready to resolve the Kashmir issue)

ते पुढे म्हणाले की, ''जगातील एक तृतीयांश लोकसंख्या कोणत्या ना कोणत्या संघर्षात गुंतलेली आहे, आपण आपल्या प्रदेशाला संघर्षापासून दूर ठेवणे महत्त्वाचे आहे. या एपिसोडमध्ये, भारत आणि चीनमध्ये सुरु असलेला सीमेवरील तणावही आपल्यासाठी चिंतेचा विषय आहे. संवाद आणि मुत्सद्देगिरीने हा प्रश्न सोडवला जावा अशी आमची इच्छा आहे.''

Pakistan's Army Chief General Bajwa
"हो, तुम्ही पंतप्रधान नसताना पाकिस्तान महान होता"

वाद मिटवण्यासाठी संवाद

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा पुढे म्हणाले की, 'हीच ती संधी आहे, जेव्हा प्रदेशातील राजकीय नेतृत्वाने भावनिक आणि संकुचित मुद्द्यांवरुन उठून व्यापक हितासाठी एकत्र यावे.' दोन दिवसीय इस्लामाबाद सुरक्षा संवाद 2022 ला संबोधित करताना लष्करप्रमुख म्हणाले की, ''पाकिस्तानचा गटबाजीच्या राजकारणावर विश्वास नाही. आज आपल्याला बौद्धिक वादविवादासाठी अशा ठिकाणांचा विकास आणि प्रचार करण्याची गरज आहे, जिथे जगभरातील लोक कल्पना सामायिक करण्यासाठी एकत्र येतात. आर्थिक आणि सामरिक संघर्षाच्या चौरस्त्यावर उभा असलेला देश म्हणून पाकिस्तानला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे.''

Pakistan's Army Chief General Bajwa
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची खुर्ची धोक्यात; पाकिस्तानचा पंतप्रधान कोण होणार?

सुरक्षा धोरणाच्या केंद्रस्थानी नागरिकांची सुरक्षा आणि समृद्धी - बाजवा

पाकिस्तानचे लष्करप्रमुख पुढे म्हणाले की, ''आमच्या सुरक्षा धोरणाच्या केंद्रस्थानी नागरिकांची सुरक्षा, प्रतिष्ठा आणि समृद्धी हे पाकिस्तानचे पहिले राष्ट्रीय सुरक्षा धोरण आहे. पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी बलिदान दिले आहे. मात्र, दहशतवाद आणि हिंसक अतिरेकींचा धोका अजूनही कायम आहे. या मुद्द्यावर अंतरिम अफगाण सरकार आणि इतर शेजारी देशांसोबत आम्ही काम करत आहोत.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com