Restore Monarchy In Nepal: ''राजेशाही बहाल करा...'', हिंदू नेत्याने नेपाळमध्ये सुरु केले आंदोलन; हजारो लोक उतरले रस्त्यावर!

Restore Monarchy Hindu Leader Movement In Nepal: भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये सध्या प्रचंड गदारोळ सुरु आहे.
Restore MonarchyIn Nepal
Restore MonarchyIn NepalDanik Gomantak

Restore Monarchy Hindu Leader Movement In Nepal: भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये सध्या प्रचंड गदारोळ सुरु आहे. जगातील बहुतांश देश लोकशाहीला चालना देण्यावर भर देत असताना नेपाळमध्ये मात्र राजेशाहीची मागणी होत आहे. राजधानी काठमांडूमध्ये गुरुवारी पोलिस आणि आंदोलक गटांमध्ये जोरदार चकमक झाली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

दरम्यान, 28 मे 2008 रोजी नवनिर्वाचित लोकसभेने नेपाळला 240 वर्षांची राजेशाही संपवून संघीय लोकशाही प्रजासत्ताक घोषित केले. या ऐतिहासिक क्षणानंतर 15 वर्षांनंतर नेपाळमध्ये पुन्हा एकदा राजेशाहीची मागणी होत आहे. नेपाळच्या (Nepal) गृह मंत्रालयाने म्हटले आहे की, लष्कराला स्टँडबाय ठेवण्यात आले होते, मात्र त्यांचा वापर करण्याची गरज पडली नाही.

Restore MonarchyIn Nepal
Nepal Bans TikTok: नेपाळचा चीनला दणका! कॅबिनेट बैठकीनंतर टिकटॉकवर बंदी; सामाजिक सलोखा बिघडवल्याचा आरोप

कोण आहेत दुर्गा प्रसाई?

राजेशाही समर्थक आंदोलकांचे नेतृत्व दुर्गा प्रसाई करत आहेत. दुर्गा प्रसाई एक उद्योजक आणि माजी माओवादी कार्यकर्ते आहेत. केपी ओली यांच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ युनिफाइड मार्क्सिस्ट लेनिनिस्ट (CPN-UML) च्या केंद्रीय समितीचे ते सदस्यही आहेत.

आता ते स्वत: कम्युनिस्ट राजवटीच्या विरोधात आवाज उठवत आहेत. गुरुवारी काठमांडू येथील बल्खू येथे झालेल्या निदर्शनादरम्यान सीपीएन-यूएमएलच्या युथ विंग (युबसंघ) आणि दुर्गा प्रसाई यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली.

दरम्यान, मोटारसायकल रॅलीदरम्यान बल्खू इथे पोहोचल्यानंतर प्रसाई यांच्या समर्थकांनी यूएमएल कार्यकर्त्यांवर दगडफेक केली. आंदोलकांनी वापरलेल्या आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांचेही प्रसाई समर्थकांनी नुकसान केले.

आपल्या 'राष्ट्र, राष्ट्रवाद, धर्म-संस्कृती आणि नागरी बचाव अभियान' अंतर्गत लोकांना संघटित करणार्‍या प्रसाई यांनी शासन उलथून टाकण्याचा आणि राजेशाही आणि हिंदू साम्राज्य पुनर्स्थापित करण्याचा इशारा दिला आहे.

Restore MonarchyIn Nepal
Nepal Dashain: नेपाळच्या राजदेवी मंदिरात 15,000 बकऱ्यांचा बळी, दशैन उत्सव नक्की काय आहे?

‘पंतप्रधान पुष्पकमल दहल यांनी जनतेसमोर शरणागती पत्करावी’

दुसरीकडे, युथ विंगने तीनकुणे इथे स्वतंत्र मेळावा घेतला, त्यासाठी जागा देण्यात आली. संघटनेचे माजी प्रमुख आणि ओली यांचे निकटवर्तीय महेश बस्नेत यांनी प्रसाईसारख्या लोकांना गोंधळाची परिस्थिती निर्माण करु देणार नाही, असे म्हटले आहे. नंतरच्या दिवशी, प्रसाई म्हणाले की, ही चळवळ "विद्यमान व्यवस्थेच्या विरोधात लोकांचे सामूहिक बंड" होती.

त्यांनी पंतप्रधान पुष्पकमल दहल यांना "लोकांना शरण जावे आणि देशाने कोणत्या प्रकारची राजकीय व्यवस्था स्वीकारावी यासाठी त्यांच्या इच्छेचे पालन करावे.'' प्रसाई या आंदोलनाला 'देश बचाओ' असे नाव दिले आहे. त्यांनी विरोधी पक्षनेते केपी ओली यांच्यावरही टीका केली आहे.

प्रसाई पुढे म्हणाले की, "राजकीय नेत्यांच्या लूटमारीला आमचा विरोध आहे. बँका, सहकारी संस्था आणि वित्तीय संस्थांनी लोकांची पिळवणूक केली आहे आणि या संस्थांनी दिलेले 20 लाख रुपयांपेक्षा कमी कर्ज माफ करावे, अशी आमची इच्छा आहे." प्रसाई यांनी राजधानीतील (काठमांडू) व्यावसायिकांना 24 नोव्हेंबरपासून त्यांची दुकाने बंद ठेवण्यासाठी आवाहन केले आहे.

Restore MonarchyIn Nepal
Nepal: माऊंट एव्हरेस्ट पाहून परतताना हेलीकॉप्‍टर क्रॅशमध्ये सहा जणांचा मृत्यू

राजेशाहीचा अंत

दरम्यान, निवडून आलेल्या लोकसभेने 2008 मध्ये 239 वर्षे जुनी राजेशाही संपुष्टात आणली. 1996 ते 2006 दरम्यान झालेल्या बंडात सुमारे 17,000 लोक मारले गेले. 2008 मध्ये फेडरल रिपब्लिकची स्थापना झाली.

परंतु राजेशाही संपल्यानंतर नेपाळमध्ये 10 पेक्षा जास्त वेळा सरकार बदलल्यामुळे राजकीय अस्थिरता, आर्थिक वाढ खुंटली आणि लाखो तरुणांना प्रामुख्याने मलेशिया, दक्षिण कोरिया (South Korea) आणि मध्य पूर्वमध्ये काम करण्यास भाग पाडले गेले.

माजी माओवादी बंडखोर प्रमुख पुष्प कमल दहल हे आता नेपाळचे पंतप्रधान आहेत. ते मध्यवर्ती नेपाळी काँग्रेस आघाडीसोबत सत्तेत आहेत.

Restore MonarchyIn Nepal
Nepal Presidential Election: रामचंद्र पौडेल बनले नेपाळचे नवे राष्ट्रपती, एवढ्या मतांनी झाले विजयी

''नेपाळी राजघराण्याची हत्या''

एकीकडे नेपाळ माओवादी बंडखोरीशी झुंजत असताना जवळपास संपूर्ण नेपाळी राजघराण्याची हत्या झाली. हे ''नेपाळी शाही हत्याकांड'' म्हणून ओळखले जाते. 1 जून 2001 रोजी नेपाळी राजेशाहीचे तत्कालीन निवासस्थान असलेल्या नारायणहिटी पॅलेसमध्ये नेपाळी शाही हत्याकांड घडले.

राजवाड्यात राजघराण्यातील मेळाव्यादरम्यान झालेल्या गोळीबारात राजा बिरेंद्र आणि राणी ऐश्वर्या यांच्यासह राजघराण्यातील नऊ जणांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, सरकारने नियुक्त केलेल्या तपास पथकाला क्राउन प्रिन्स दीपेंद्र हे हत्याकांडाचे गुन्हेगार असल्याचे आढळले. डोक्याला गोळी लागल्याने दीपेंद्र कोमात गेले होते. राजा बिरेंद्र यांच्या निधनानंतर दीपेंद्र बेशुद्ध अवस्थेत असताना त्यांना नेपाळचा राजा घोषित करण्यात आले. हत्याकांडानंतर तीन दिवसांनी शुद्धीवर न येता त्यांचा रुग्णालयातच मृत्यू झाला. बीरेंद्र यांचे बंधू ज्ञानेंद्र पुन्हा राजा झाले. नेपाळचे शेवटचे राजे ज्ञानेंद्र होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com