Nepal: माऊंट एव्हरेस्ट पाहून परतताना हेलीकॉप्‍टर क्रॅशमध्ये सहा जणांचा मृत्यू

Nepal: नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये परतणार होते.
Helicopter Crash
Helicopter CrashDainik Gomantak
Published on
Updated on

Nepal: नेपाळमध्ये पुन्हा एकदा हेलिकॉप्टर दुर्घटना घडली आहे. मनांग एअरचे हेलिकॉप्टर येथे कोसळल्याचे सांगितले जात आहे. विमानात कॅप्टनसह पाच परदेशी नागरिक होते. हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर 15 मिनिटांनी कंट्रोल टॉवरशी संपर्क तुटल्याचे नेपाळच्या माध्यमांनी सांगितले.

मंगळवारी सकाळी या हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते मात्र तेव्हापासून बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. हेलिकॉप्टर राजधानी काठमांडूला पोहोचणार होते. त्रिभुवन विमानतळाचे महाव्यवस्थापक प्रताप बाबू तिवारी यांनी सांगितले की, 9N-AMV कॉल साइन असलेल्या हेलिकॉप्टरचा उड्डाणानंतर 15 मिनिटांनी संपर्क तुटला.

नेपाळच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाचे माहिती अधिकारी ज्ञानेंद्र भुल यांनी सांगितले की, हेलिकॉप्टरने सकाळी 9.45 वाजता सोलुखुंबू येथील सुर्की येथून उड्डाण केले. हेलिकॉप्टरमध्ये बसलेले पाच विदेशी पर्यटक हे मेक्सिकोचे होते. हे सर्वजण माउंट एव्हरेस्ट हे शिखर पाहण्यासाठी गेले होते. मंगळवारी सकाळी नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये परतणार होते.

Helicopter Crash
Exercise And Depression: मधुमेह अन् हृदयविकार रुग्णांच्या नैराश्यावर तज्ज्ञांनी शोधला नवा फॉर्म्यूला; पाच दिवस दररोज करा...

एपीच्या वृत्तानुसार, विमानतळ अधिकारी सागर कडेल यांनी सांगितले की, खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरला आपला मार्ग बदलावा लागल्याची माहीती समोर आली आहे. विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर वरिष्ठ पायलट कॅप्टन चेत गुरुंग उडवत होते.

2018 मध्ये कैलास मानसरोवर भारतीय प्रावाशाच्या मृत्यूनंतर मनांग एअरचा हेलिकॉप्टर परवाना रद्द करण्यात आला होता. हेलीपॅडवर हेलिकॉप्टरच्या मागील ब्लेडला धक्का लागल्याने हिलसा परिसरात यात्रेकरूचा मृत्यू झाला होता. मात्र त्यानंतर परवान्याला मान्यता दिली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com