Nepal Presidential Election: रामचंद्र पौडेल बनले नेपाळचे नवे राष्ट्रपती, एवढ्या मतांनी झाले विजयी

रामचंद्र पौडेल यांची नेपाळचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पौडेल यांना 33,802 इलेक्टोरल मते मिळाली.
Ram Chandra Paudel
Ram Chandra PaudelTwitter / @ANI
Published on
Updated on

Ram Chandra Paudel: रामचंद्र पौडेल यांची नेपाळचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पौडेल यांना 33,802 इलेक्टोरल मते मिळाली, तर त्यांचे विरोधक सुभाष चंद्र नेंबवांग यांना 15,518 मते मिळाली. नेपाळच्या निवडणूक आयुक्तांनी ही माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यमान राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांचा कार्यकाळ 12 मार्च रोजी संपत आहे. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधी येथील संसद भवनात गुरुवारी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान झाले होते. यानंतर निकाल जाहीर झाला.

Ram Chandra Paudel
नेपाळ: भारतीय दूतावासाने मुस्तांगमधील शाळेच्या सुधारित पायाभूत सुविधांचे केले उद्घाटन

दुसरीकडे, रामचंद्र पौडेल यांना नेपाळी काँग्रेस आणि सीपीएन यासह आठ पक्षांच्या युतीकडून 214 खासदार आणि 352 प्रांतीय विधानसभा सदस्यांची मते मिळाली. नेपाळी काँग्रेसचे प्रमुख शेर बहादूर देउबा यांनी ट्विट केले की, 'माझे मित्र रामचंद्र पौडेल यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.'

तसेच, निवडणूक आयोगाचे प्रवक्ते शालिग्राम यांनी सांगितले की, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 518 प्रांतीय असेंब्ली आणि फेडरल संसदेच्या 313 सदस्यांनी मतदान केले. 2008 मध्ये प्रजासत्ताक बनल्यानंतर नेपाळमधील ही तिसरी राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे.

Ram Chandra Paudel
पंतप्रधान मोदी नेपाळ दौऱ्यावर; लुंबिनी येथे महामाया देवीचे घेतले दर्शन

रामचंद्र पौडेल यांच्यावर नेपाळी काँग्रेसने बाजी मारली होती

नेपाळमधील (Nepal) सर्वात मोठा पक्ष असलेल्या नेपाळी काँग्रेसने संसदेतील आपले ज्येष्ठ नेते रामचंद्र पौडेल यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उभे केले आहे.

पौडेल यांची उमेदवारी नेपाळी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शेर बहादूर देउबा, सीपीएन (युनिफाइड सोशलिस्ट) अध्यक्ष माधव कुमार नेपाळ, सीपीएन-माओवादी केंद्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष नारायण काजी श्रेष्ठ, जनता समाजवादी पार्टी फेडरल कौन्सिलचे अध्यक्ष अशोक राय आणि जनमत पार्टीचे अध्यक्ष अब्दुल खान यांनी मांडली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com