Nepal Bans TikTok: नेपाळचा चीनला दणका! कॅबिनेट बैठकीनंतर टिकटॉकवर बंदी; सामाजिक सलोखा बिघडवल्याचा आरोप

Nepal Bans TikTok: नेपाळमध्ये कॅबिनेट बैठकीनंतर टिकटॉकवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Tiktok App
Tiktok App Dainik Gomantak

Nepal Bans TikTok: नेपाळमध्ये कॅबिनेट बैठकीनंतर टिकटॉकवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या माहिती आणि दळणवळण मंत्री रेखा शर्मा यांनी सोमवारी सांगितले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत टिकटॉकवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण टेक्नीकल बंदी नंतर लागू होईल.

एएनआयशी बोलताना मंत्री शर्मा म्हणाल्या की, “नेपाळमध्ये आजपासून पॉलिसी स्तरावर टिकटॉकवर बंदी घालण्यात आली आहे. बंदी लादण्याच्या टेक्नीकल बाबींसाठी थोडा वेळ लागेल.''

सायबर गुन्ह्यांचे एकूण 1648 गुन्हे दाखल

दरम्यान, TikTok वर शेअर केलेल्या कंटेंटमुळे सामाजिक सलोखा बिघडल्याचा आरोप झाल्यानंतर नेपाळ सरकारने हा निर्णय घेतला आहे. नेपाळ पोलिसांच्या सायबर ब्युरोमध्ये गेल्या 4 वर्ष आणि 3 महिन्यांत एकूण 1648 सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती, ज्यातील बहुतेक प्रकरणे टिकटॉकच्या सामग्रीशी संबंधित आहेत.

चिनी सोशल मीडिया (Social Media) TikTok वर आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याची कोणतीही तरतूद नाही. TikTok वर बंदी घालणारा नेपाळ हा नवीनतम देश बनला आहे. 50 हून अधिक देशांमध्ये आधीच बंदी घालण्यात आली आहे.

दुसरीकडे, सरकारने 'सोशल नेटवर्किंगच्या ऑपरेशनवर दिशानिर्देश 2023' सादर केल्यानंतर काही दिवसांतच हा ताजा निर्णय आला आहे. नवीन नियमानुसार, नेपाळमध्ये कार्यरत असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला देशात त्यांची कार्यालये सुरु करणे आवश्यक आहे.

Tiktok App
Nepal: माऊंट एव्हरेस्ट पाहून परतताना हेलीकॉप्‍टर क्रॅशमध्ये सहा जणांचा मृत्यू

संपर्क कार्यालये उघडणे अनिवार्य

यापूर्वी, गुरुवारी नेपाळने फेसबुक, एक्स, टिकटॉक आणि यूट्यूब सारख्या सोशल मीडिया साइट्सना नेपाळमध्ये (Nepal) संपर्क कार्यालये उघडणे अनिवार्य केले. निर्देश लागू झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत कंपन्यांना नेपाळमध्ये कार्यालय स्थापन करावे लागेल किंवा फोकल पर्सन नियुक्त करावे लागेल.

त्यांना त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे करण्यात अयशस्वी झाल्यास शटडाउन होऊ शकते.

Tiktok App
Nepal: नेपाळच्या माजी उपपंतप्रधानाला अटक, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

भारत सरकारने जून 2020 मध्ये त्यावर बंदी घातली होती

सरकारने जारी केलेल्या निर्देशांमध्ये Facebook, X, TikTok, YouTube आणि Instagram सारख्या प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्यांसाठी 19-बिंदूंची लिस्ट समाविष्ट आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, जून 2020 मध्ये, भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव इतर अनेक चीनी अॅप्ससह TikTok वर बंदी घातली होती.

बंदीपूर्वी, अॅपचे भारतात सुमारे 150 दशलक्ष सक्रिय वापरकर्ते होते. ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, कॅनडा, अफगाणिस्तान, डेन्मार्क, नेदरलँड, न्यूझीलंड आणि नॉर्वेमध्ये सुरक्षा समस्यांमुळे TikTok अॅपवर अंशतः किंवा पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com