
पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि एका चिमुकलीचा गोड व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत चिमुकलीने मुख्यमंत्र्यांना मारलेली प्रेमाची घट्ट मिठी आणि दोघांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य सर्वांच्याच ह्रदयाला स्पर्श करत आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी देखील हा व्हिडिओ त्यांच्या Instagram Account वरुन शेअर केला आहे.
कंदब बस स्थानक येथे फाळणी स्मृती दिनाच्या निमित्ताने फाळणीच्या आठवणींना उजाळा देणारे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. १४ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्धाटन पार पडले. यावेळी एक चिमुकली प्रदर्शन पाहत असताना मुख्यमंत्र्यांना दिसली. मुख्यमंत्र्यांना चिमुकलीला पाहताच जवळ घेतले, मुख्यमंत्री सावंतांना पाहताच चिमुकली देखील त्यांना बिलगली. मुख्यमंत्र्यांनी नंतर चिमुकली उचलून कडेवर घेतले.
मुख्यमंत्र्यांनी उचलून घेतल्याच्या आनंदात असलेल्या चिमुकलीने प्रेमाने मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात पडत घट्ट मिठी मारली. मुख्यमंत्र्यांनी तेवढ्याच प्रेमाने तिला जवळ घेतले. यावेळी दोघांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले. याप्रसंगाने जवळ उपस्थित असलेल्या इतर मान्यवरांच्या देखील चेहऱ्यावर स्मित हास्य दिसून आले. यावेळी पर्यटन मंत्री रोहन खंवटे आणि पणजी महानगर पालिकेचे महापौर रोहित मोन्सेरात उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओ ९ हजार जणांनी लाईक केले असून, २०० पेक्षा अधिक जणांना त्यावर कमेंट केली आहे.
कंदब बस स्थानकात विभाजन – विभिषिका स्मृती दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाचे गुरुवारी (१४ ऑगस्ट) मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते उद्धाटन झाले. "भारताची फाळणी होऊन पाकिस्तान आणि भारत अशा दोन देशांची निर्मिती झाली. फाळणीच्या काळात अनेक याताना नागरिकांना सोसाव्या लागल्या, याची आठवण म्हणून फाळणी स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो,” असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यावेळी म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.