Viral Video: रिल्ससाठी कायपण! साडी नेसून पठ्ठ्याने लावले ठुमके, मेट्रोमधील भन्नाट डान्स व्हायरल; नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत घेतली शाळा

Viral Reel Delhi Metro: असाच एक प्रकार दिल्ली मेट्रोमधून समोर आला आहे, जिथे एका तरुणाने साडी नेसून डान्स केला. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
Viral Video News
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Viral Reel Delhi Metro: आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात प्रत्येकजण रील आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपली प्रतिभा, सर्जनशीलता किंवा काहीतरी हटके दाखवून प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करत असतो. पण अनेक वेळा हे प्रयत्न अशा काही विचित्र कृत्यांमध्ये बदलतात, ज्यामुळे लोक व्हायरल तर होतात, पण त्याचबरोबर वादाच्या भोवऱ्यातही अडकतात. सध्या असाच एक प्रकार दिल्ली मेट्रोमधून समोर आला आहे, जिथे एका तरुणाने साडी नेसून डान्स केला. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा!

साडी नेसून तरुणाने केला डान्स

दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण दिल्ली (Delhi) मेट्रोत साडी नेसून डान्स करताना दिसत आहे. तो एका बॉलिवूड गाण्यावर रील बनवत आहे. साडीमध्ये डान्स करणाऱ्या या तरुणाचा आत्मविश्वास पाहण्यासारखा आहे. मेट्रोमध्ये गर्दी असतानाही तो बिनधास्तपणे डान्स करत आहे. मेट्रोमधील इतर प्रवासी मात्र आश्चर्याने त्याच्याकडे पाहत आहेत. हा व्हिडिओ एक्स (X) प्लॅटफॉर्मवर @delhi.connection नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. बातमी लिहेपर्यंत हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला.

Viral Video News
Viral Video: मुख्यमंत्र्यांना पाहताच बिलगली, गळ्यात पडून घट्ट मिठी मारली; प्रमोद सावंत आणि चिमुकलीचा गोड व्हिडिओ पाहा

व्हिडिओ पाहून लोकांचा संताप

सोशल मीडियावर (Social Media) या व्हिडिओबद्दल लोकांनी आपला राग व्यक्त केला. काही युजर्संनी तरुणाच्या आत्मविश्वासाचे कौतुक केले असले, तरी बहुतांश लोकांनी या कृत्याला 'अश्लील' म्हटले. एका युजरने कमेंट केली की, “मेट्रोमध्ये हे सगळं करण्याची काय गरज आहे? लाज वाटत नाही का?” तर दुसऱ्याने लिहिले, “फेमस होण्यासाठी लोक काहीही करु शकतात, पण हे तर खूपच जास्त झाले.”

Viral Video News
Viral Video: ‘हॅप्पी अंडस पंडस...’! स्वातंत्र्य दिनाची तयारी करणाऱ्या चिमुकल्याचा मजेदार व्हिडिओ व्हायरल, तुम्हीही हसून-हसून व्हाल लोटपोट

दिल्ली मेट्रोमध्ये अशा प्रकारचे व्हिडिओ किंवा रील्स बनवल्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अनेकदा अशा घटना समोर आल्या आहेत. यामुळे सार्वजनिक ठिकाणी शिष्टाचार पाळला जात नाही, अशी चिंताही व्यक्त केली जात आहे. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी लोक सार्वजनिक ठिकाणी कोणतेही भान न ठेवता असे विचित्र कृत्य करताना दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com