New York Times Square Firing: न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये पुन्हा गोळीबार; NBA चॅम्पियनशिपच्या जल्लोषादरम्यान गोंधळ, संशयित ताब्यात VIDEO

Times Square Shooting New York NBA Celebration: अमेरिकेतील सर्वात गजबजलेला परिसर असलेल्या न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये गुरुवारी (18 जून) दुपारी अचानक झालेल्या गोळीबाराच्या घटनेने प्रचंड खळबळ उडाली.
New York Times Square Firing
New York Times Square FiringDainik Gomantak
Published on
Updated on

Times Square Shooting New York NBA Celebration: अमेरिकेतील सर्वात गजबजलेला परिसर असलेल्या न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये गुरुवारी (18 जून) दुपारी अचानक झालेल्या गोळीबाराच्या घटनेने प्रचंड खळबळ उडाली. नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन चॅम्पियनशिपमध्ये 'न्यूयॉर्क निक्स'च्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष करण्यासाठी लोअर मॅनहॅटनच्या रस्त्यांवर हजारो लोकांची गर्दी उसळली होती. हा आनंदोत्सव सुरु असतानाच गुरुवारी दुपारी स्थानिक वेळेनुसार सुमारे 3:40 वाजण्याच्या सुमारास टाइम्स स्क्वेअर परिसरात एकामागून एक गोळ्या झाडल्या गेल्या.

गोळीबाराचा आवाज येताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आणि लोकांनी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळायला सुरुवात केली. न्यूयॉर्क पोलीस विभागाने या घटनेला दुजोरा दिला असून गोळीबार करणाऱ्या संशयित आरोपीला (Accused) घटनास्थळावरुन तातडीने ताब्यात घेण्यात आले.

New York Times Square Firing
Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

या गोळीबारात एक व्यक्ती जखमी झाली असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती न्यूयॉर्कच्या अग्निशमन दलाने दिली. मात्र, जखमी झालेल्या व्यक्तीच्या प्रकृतीबाबत अधिक तपशील अद्याप समोर आलेला नाही. ज्या ठिकाणी हा गोळीबार झाला, तिथून अवघ्या काही मीटर अंतरावर पोलिसांची गाडी उभी होती. सोशल मीडियावर या घटनेचे धक्कादायक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये गोळ्यांचा थरारक आवाज ऐकू येत आहे आणि पर्यटक तसेच स्थानिक नागरिक सुरक्षित जागा शोधण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत.

New York Times Square Firing
Donald Trump Tariff Cut: डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! शेती आणि औद्योगिक उपकरणांवरील आयात शुल्कात 10 टक्क्यांची कपात; डिसेंबर 2027 पर्यंत मिळणार सूट

विशेष म्हणजे, या भव्य विजयोत्सवासाठी सुरक्षा व्यवस्था म्हणून शहरात सुमारे 10000 पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले होते, तरीही या गर्दीचा फायदा घेत गोळीबार करण्यात आला. गेल्या आठवड्यापासून सुरु असलेल्या या स्पर्धेमुळे संपूर्ण परिसर क्रीडाप्रेमींनी ओसंडून वाहिला होता.

New York Times Square Firing
Donald Trump: "इराणला जगाच्या नकाशावरुन पुसून टाकू!" डोनाल्ड ट्रम्प यांची खुलेआम धमकी; लवकरच पडणार युद्धाची ठिणगी? VIDEO

टाइम्स स्क्वेअरमधील सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला, कारण 16 जून रोजीही याच परिसरात अशाच प्रकारची गोळीबाराची घटना घडली होती. तब्बल 53 वर्षांच्या प्रदीर्घ अंतरानंतर 'न्यूयॉर्क निक्स'ने एनबीए चॅम्पियनशिप जिंकल्यामुळे चाहत्यांचा हा जल्लोष काही तासांतच हिंसक आणि अनियंत्रित झाला होता. 16 जूनच्या रात्री झालेल्या गोळीबारानंतर शेकडो लोकांना जीव मुठीत धरुन पळावे लागले होते आणि पोलिसांनी (Police) एका व्यक्तीकडून लोड केलेली बंदूकही जप्त केली होती.

New York Times Square Firing
Donald Trump: "मीच नाटोचा तारणहार!" डोनाल्ड ट्रम्प यांचा जागतिक राजकारणात नवा धमाका; ग्रीनलँडवर फडकणार अमेरिकेचा झेंडा?

त्या घटनेतून सावरत नाही तोपर्यंत गुरुवारी पुन्हा एकदा भरदिवसा झालेल्या गोळीबारामुळे न्यूयॉर्क शहरात भीतीचे वातावरण पसरले. पोलीस सध्या या दोन्ही घटनांचा परस्परांशी काही संबंध आहे का, याचा तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com