Donald Trump: "मीच नाटोचा तारणहार!" डोनाल्ड ट्रम्प यांचा जागतिक राजकारणात नवा धमाका; ग्रीनलँडवर फडकणार अमेरिकेचा झेंडा?

Donald Trump NATO Statement: नाटोबद्दल बोलताना ट्रम्प यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली. त्यांच्या मते, नाटो सदस्य देशांनी आपल्या संरक्षण खर्चात केलेली वाढ ही केवळ त्यांच्या दबावामुळेच शक्य झाली.
Donald Trump
Donald TrumpDainik Gomantak
Published on
Updated on

Donald Trump NATO Statement: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करुन राळ उडवत आहेत. यातच आता पुन्हा एकदा त्यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडवून दिली. ट्रम्प यांनी दावा केला की, त्यांच्यामुळेच आज 'नाटो' (North Atlantic Treaty Organization) ही संघटना अस्तित्वात आहे. इतकेच नाही, तर त्यांनी डेन्मार्कचा भाग असलेल्या ग्रीनलँड बेटावर अमेरिकेचे नियंत्रण असावे, अशी आपली जुनी इच्छा पुन्हा एकदा बोलून दाखवली.

"मी नसतो तर नाटो इतिहासजमा झाला असता"

नाटोबद्दल (NATO) बोलताना ट्रम्प यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली. त्यांच्या मते, नाटो सदस्य देशांनी आपल्या संरक्षण खर्चात केलेली वाढ ही केवळ त्यांच्या दबावामुळेच शक्य झाली. ट्रम्प म्हणाले, "नाटोला वाचवणारा मीच आहे. मीच त्यांना त्यांच्या जीडीपीचा 5.5% हिस्सा संरक्षणावर खर्च करण्यासाठी राजी केले. माझ्या येण्यापूर्वी हे प्रमाण केवळ 2% होते आणि अनेक देश तेवढाही खर्च करत नव्हते. आता ते 5% देत आहेत. जर मी राष्ट्राध्यक्ष नसतो, तर आज नाटो अस्तित्वातच नसते."

Donald Trump
Donald Trump Warship: ट्रम्पचा धमाका! तयार करणार जगातील सर्वात मोठी युद्धनौका; वाचा थरकाप उडवणारी माहिती

ट्रम्प यांनी पुढे असेही संकेत दिले की, जर अमेरिका नाटोमधून बाहेर पडला, तर अमेरिकेचा खूप पैसे वाचू शकतो. "मला नाटो ही संघटना आवडते, पण जर कधी अमेरिकेला नाटो सदस्यांची गरज पडली, तर ते आमच्यासाठी उभे राहतील का? याबाबत मला खात्री नाही. आम्ही नाटोवर अफाट पैसा खर्च केला आहे," असेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या या वक्तव्यांमुळे युरोपीय देशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Donald Trump
Donald Trump Dance: मलेशियात उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका! सोशल मीडियावर 'तो' भन्नाट डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल; तुम्ही पाहिलाय का? VIDEO

ग्रीनलँड: रशिया आणि चीनपासून संरक्षणाचे कारण

ग्रीनलँड या जगातील सर्वात मोठ्या बेटाबाबत ट्रम्प यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. ग्रीनलँड हे भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे असून त्यावर सध्या डेन्मार्कचे नियंत्रण आहे. ट्रम्प यांच्या मते, जर अमेरिकेने ग्रीनलँडवर आपले नियंत्रण मिळवले नाही, तर रशिया किंवा चीन या बेटावर कब्जा करतील.

"मी रशिया (Russia) किंवा चीनला ग्रीनलँडवर ताबा मिळवू देणार नाही. मला डेन्मार्कसोबत ग्रीनलँडबाबत करार करायला नक्कीच आवडेल. ते सोपेही होईल. पण कोणत्याही परिस्थितीत आम्हाला ग्रीनलँड घ्यायचा आहे," असे ट्रम्प यांनी ठामपणे सांगितले. ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळातही ग्रीनलँड खरेदी करण्याचा प्रस्ताव मांडला होता, ज्याला डेन्मार्कने त्यावेळी कडाडून विरोध केला होता. मात्र, आता पुन्हा हा विषय काढून त्यांनी अमेरिकेच्या विस्तारवादी धोरणाचे संकेत दिले आहेत.

Donald Trump
Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

जागतिक राजकारणावर होणारे परिणाम

ट्रम्प यांच्या या वक्तव्यांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. नाटो देशांनी ट्रम्प यांच्या 5.5% खर्चाच्या दाव्यावर अद्याप अधिकृत भाष्य केलेले नाही, परंतु अमेरिकेने नाटोमधून बाहेर पडण्याची भाषा केल्यास जागतिक सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. दुसरीकडे, ग्रीनलँडवर दावा सांगितल्यामुळे डेन्मार्क आणि अमेरिका यांच्यातील राजनैतिक संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प यांची ही विधाने 'अमेरिका फर्स्ट' (America First) या धोरणाचा भाग आहेत. त्यांना अमेरिकेचा पैसा वाचवायचा आहे आणि त्याचवेळी रशिया-चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी मोक्याच्या ठिकाणांवर ताबा मिळवायचा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com