TikTok Layoffs in India : टिकटॉकच्या भारतातील प्रवासाला फुल्लस्टॉप! संपूर्ण भारतीय टीमला दाखवला घरचा रस्ता

चिनी शॉर्ट व्हिडीओ अॅप टिकटॉकचा भारतातील प्रवास आता संपला आहे.
TikTok Banned in India
TikTok Banned in IndiaDainik Gomantak

TikTok Layoffs in India : चिनी शॉर्ट व्हिडीओ अॅप टिकटॉकचा भारतातील प्रवास आता संपला आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, TikTok ने भारतातील आपल्या संपूर्ण कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.

ByteDance-मालकीच्या अॅपने या आठवड्याच्या सुरुवातीला संपूर्ण भारतातील कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला. याबदल्यात त्यांना नऊ महिन्यांपर्यंतचे विभक्त वेतन देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

शेवटचा दिवस

टिकटॉक इंडियाच्या कर्मचार्‍यांना 28 फेब्रुवारी हा त्यांचा शेवटचा दिवस असेल असे सांगण्यात आले आहे. आता त्यांना काही काळ इतर संधी शोधण्याची अनुभूती देण्यात आली; कारण चिनी अॅप्सवरील सरकारच्या ठाम भूमिकेमुळे भारतात अॅपचा पुन्हा वापर सुरू करणे शक्य नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सरकारने जून 2020 पासून टप्प्याटप्प्याने TikTok आणि जवळपास 300 इतर चिनी अॅप्सवर बंदी घातल्यानंतर यापैकी अनेक कर्मचारी दुबई आणि ब्राझीलच्या मार्केटमध्ये काम करत आहेत.

आधी बंदी आणि नंतर कायमची बंदी

भारत सरकारने जून 2020 मध्ये TikTok वर बंदी घातली होती. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (Meity) 50 हून अधिक चिनी अॅपवर बंदी घातली. मंत्रालयाने दिलेल्या ऑर्डरमध्ये म्हटले आहे की, हे चिनी अॅप्स भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता, भारताचे संरक्षण, राज्याची सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी प्रतिकूल आहेत.

यामुळे असे अनेक चिनी अॅप भारतीयांना वापरासाठी बंद करण्यात आले.

TikTok अॅपवर जून 2020 मध्ये बंदी घातली गेली तेव्हा भारतात 200 दशलक्षाहून अधिक लोक या अॅपचा वापर करत होते. त्यावेळी चिनी कंपनीने भारताला त्यांच्या सर्वात मोठ्या परदेशी बाजारपेठांपैकी एक मानले होते.

त्यानंतर सहा महिन्यांनंतर, जानेवारी 2021 मध्ये सरकारने टिकटॉकसह सर्व 59 चिनी अॅप्सवर कायमची बंदी घातली. त्यामुळे शॉर्ट व्हिडिओमधून करिअर करू पाहणाऱ्या लोकांना आता कधीही Tiktok चा वापर करता येणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com