Google Layoffs: गुगलचा मोठा निर्णय; शेकडो कर्मचाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता

Google Layoffs 2025: जानेवारीत राबविण्यात आलेल्या स्वेच्छा कार्मक्रमानंतर आता देखील काही कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्यात आले आहे.
Google lays off employee
Google
Published on
Updated on

Google lays off employees

गुगलने शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले आहे. गुगलच्या विविध प्रोजेक्टवरती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. अँड्रॉईड सॉफ्टवेअर, पिक्सल स्मार्टफोन आणि क्रोम ब्राऊझर या प्रोजेक्टवर काम करणाऱ्या शंभर कर्माचाऱ्यांना कामावरुन कमी केल्याचे वृत्त द इन्फॉर्मेशन या वृत्तपत्राने दिले आहे.

जानेवारी २०२५ मध्ये गुगलने कर्मचाऱ्यांना स्व - इच्छेने काम सोडण्यासाठी काही कर्मचाऱ्यांना आवाहन केले होते. त्यानंतर आता शंभर कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले आहे. गुगल अँड्रॉईड आणि क्रोम या टीम्स पिक्सल आणि इतर ग्रुपमध्ये विलीन झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. विलिनीकरण झाल्यानंतर या युनिटमधील कर्मचाऱ्यांची संख्या २० हजार झाली होती.

Google lays off employee
Hunting Accident Goa: शिकारीचा नाद जीवावर बेतला; अडवई, सत्तरीत गोळी लागून युवकाचा मृत्यू

कर्मचारी कमी केल्याच्या माहितीला गुगलकडून अधिकृतपणे दुजोरा देण्यात आल्याची माहिती 'द इन्फॉर्मेशन'ने दिली आहे. अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी प्लॅटफॉर्म आणि डिव्हाईस टीम गेल्यावर्षी एकत्र करण्यात आल्या. जानेवारीत राबविण्यात आलेल्या स्वेच्छा कार्मक्रमानंतर आता देखील काही कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्यात आले आहे. दरम्यान, आवश्यक जागा भरण्याची प्रक्रिया अमेरिकेसह इतर सर्वत्र सुरु असल्याची माहिती कंपनीच्या वतीने द इन्फॉर्मेशनला देण्यात आली आहे.

Google lays off employee
Figredo Ground: क्रिकेटसाठी तयार केलेले पीच जेसीबीने खोदले, फिग्रेदो मैदानावरील प्रकार; कुडचडेतील क्रीडाप्रेमी संतप्त

यापूर्वी गुगलने २०२३ मध्ये जगभरातून जवळपास सहा टक्के कर्मचारी कपात केली होती. त्यानंतरही काही प्रमाणात वारंवार कपात करण्यात आली. दरम्यान, गुगलची सध्याची कर्मचारी संख्या सुमारे एक लाख ८० हजार एवढी आहे. अँड्रॉईड, पिक्सल आणि क्रोम प्रोजेक्टवर काम करणाऱ्या अमेरिकेतील काही कर्मचाऱ्यांना स्व-इच्छेने काम सोडण्याचे आवाहन केले होते.

कंपनीच्या विलिनीकरण धोरणाप्रमाणे जे नव्या आव्हानांचा सामना करु शकत नाहीत किंवा अपेक्षेप्रमाणे काम करु शकत नाहीत त्यांना स्व -इच्छेने काम सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com