Israel Finally Captures Hamas 'Parliament', IDF Raises Israeli Flag:
इस्रायलने गाझामध्ये हमासचे कंबरडे मोडले आहे. गाझातील बहुतांश भाग इस्रायली लष्कराने आपल्या ताब्यात घेतला आहे. आता इस्रायली सैनिक गाझा येथील हमासच्या संसदेत पोहोचले आहेत.
इस्रायली लष्कराने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये इस्रायली सैनिक हमासच्या संसदेत आपला झेंडा फडकवताना दिसत आहेत.
इस्रायली लष्कराचे सैनिक हमासच्या संसदेत स्पीकरच्या खुर्चीवर बसलेले तसेच इस्रायलचा ध्वज फडकवताना दिसत आहेत.
इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. ते म्हणाले, इस्रायली सैनिक योजनेनुसार काम करत आहेत आणि गुप्तचर माहितीचा वापर करून ते हमासला अचूकपणे संपवत आहेत. यावेळी हवाई, सागरी आणि भूदल सैन्य समन्वयाने मोहिमा राबवत आहेत.
ते म्हणाले, हमासमध्ये आयडीएफला रोखू शकण्याची ताकद नाही. IDF प्रत्येक टप्प्यावर प्रगती करत आहे. हमासने गाझावरील नियंत्रण गमावले आहे, दहशतवादी दक्षिणेकडे पळून जात आहेत, नागरिक हमासच्या तळांना लुटत आहेत आणि त्यांचा सरकारवर विश्वास नाही.
इस्रायली सैन्याने म्हटले आहे की, IDF ने हमासच्या 24 बटालियनपैकी 10 प्रभावीपणे नष्ट केल्या आहेत.
७ ऑक्टोबर हमासने इस्रायलवर हल्ला केला. यामध्ये 1400 लोकांचा मृत्यू झाला होता. तर हमासने २४० लोकांना ओलिस ठेवले होते. तेव्हापासून इस्रायल गाझा पट्टीवर सतत बॉम्बफेक करत आहे.
तसेच गेल्या १५ दिवसांपासून इस्रायली लष्कराचे ग्राउंड ऑपरेशन सुरू आहे. इस्रायलने हजारो गावे आणि हमासच्या छावण्या नष्ट केल्या आहेत. यामध्ये आतापर्यंत 11000 लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.