Israel-Hamas War: हमास गाझामधील रुग्णालयांवर करतोय हल्ला? इस्रायलने व्हिडिओ जारी करुन उपस्थित केला प्रश्न

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात मागील महिन्यापासून युद्ध सुरु आहे. यातच आता, इस्रायलच्या संरक्षण दलाने एक व्हिडिओ शेअर केला आहे.
gaza al quds hospital hamas terrorists israel defence forces courses
gaza al quds hospital hamas terrorists israel defence forces coursesDainik Gomantak
Published on
Updated on

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात मागील महिन्यापासून युद्ध सुरु आहे. यातच आता, इस्रायलच्या संरक्षण दलाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. इस्रायलचा दावा आहे की, व्हिडिओमध्ये हमासचे दहशतवादी दिसत आहेत आणि ते आरपीजी लाँचर्ससह अल कुद्स हॉस्पिटलजवळ आहेत.

हमास रुग्णांचा मानवी ढाल म्हणून वापर करत असल्याचा दावा इस्रायल सातत्याने करत आहे. गाझामधील रुग्णालयांवर हल्ला करणारे हमासचे दहशतवादी असल्याचा संशयही इस्रायलने व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, युरोपियन युनियनने देखील हमासचा निषेध केला आहे की रुग्णालये आणि सामान्य लोकांचा मानवी ढाल म्हणून वापर करणे थांबवा.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की...

इस्रायली संरक्षण दलाने (IDF) हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केला आहे. व्हिडिओसोबत कॅप्शनही दिले आहे. यामध्ये हमासचा एक दहशतवादी आरपीजी लाँचर घेऊन अल कुद्स रुग्णालयाच्या दिशेने जाताना दिसला.

वाहनांची रांग ओलांडून तो रुग्णालयाच्या (Hospital) गेटच्या दिशेने पोहोचतो. त्यानंतर तो गेटसमोर उभा राहून आरपीजी लाँचरने हल्ला करताना दिसतो. आयडीएफचे म्हणणे आहे की, हा हल्ला इस्रायली सैन्यावर केला जात आहे. सुमारे 22 सेकंदांचा हा व्हिडिओ X वर लाखो लोकांनी पाहिला आहे.

gaza al quds hospital hamas terrorists israel defence forces courses
Israel Hamas War: हमास विरुद्ध लढणारा वेब सिरीज FAUDA चा क्रू मेंबर मतन मीरचा गाझामध्ये मृत्यू

EU ने दिली चेतावणी

दुसरीकडे, इस्रायलविरुद्धच्या (Israel) युद्धात रुग्णालये आणि नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर केल्याबद्दल युरोपियन युनियनच्या 27 देशांनी हमासचा निषेध केला आहे. युरोपियन युनियनचे परराष्ट्र व्यवहार प्रमुख जोसेप बोरेल यांनी सोमवारी सांगितले की, युरोपियन युनियन इस्रायलला जास्तीत जास्त संयम बाळगण्याचे आवाहन करते, जेणेकरुन नागरिकांची हानी टाळता येईल.

EU मध्ये समाविष्ट देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत 27 देशांच्या वतीने एक निवेदन जारी करण्यात आले. इस्रायल-हमास युद्धाबाबत युरोपियन युनियन देशांदरम्यान सुरु असलेला विरोधाभास सोडवण्यासाठी संयुक्त निवेदन म्हणून बोरेल यांनी हे विधान केले.

gaza al quds hospital hamas terrorists israel defence forces courses
Israel-Hamas War: काय आहे Arrow-3? हौथी बंडखोरांविरुद्ध इस्रायलने पहिल्यांदाच वापरले; व्हिडिओ

मानवतावादी कॉरिडॉर तयार करण्याचे आवाहन करा

दरम्यान, निवेदनात युद्ध ताबडतोब थांबवण्याची आणि मानवतावादी कॉरिडॉर तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे, जेणेकरुन मानवतावादी मदत गाझामधील लोकांना सुरक्षितपणे पोहोचू शकेल. त्यांनी पुन्हा एकदा हमासला सर्व ओलीसांची तात्काळ आणि बिनशर्त सुटका करण्याचे आवाहन केले.

निवेदनात म्हटले आहे की, रेड क्रॉसच्या आंतरराष्ट्रीय समितीला ओलिसांपर्यंत पोहोचवण्याची मुभा देणे आवश्यक आहे. ईयू हमासने रुग्णालये आणि नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर केल्याचा निषेध करतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com