India-Canada: कॅनडात पुन्हा दिसला भारत द्वेष, हिंदी चित्रपट दाखवणाऱ्या तीन थिएटरमध्ये हल्ले

Hindi Movies In Canada: अज्ञात व्यक्तींनी काही पदार्थ फवारल्यानंतर प्रेक्षकांना बाहेर काढण्यात आले आणि त्याच्या संपर्कात आलेल्या काही लोकांवर उपचार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
Hindi Movies In Canada
Hindi Movies In CanadaDainik Gomantak
Published on
Updated on

India hatred resurfaces in Canada, attacks on three theaters showing Hindi films:

हिंदी चित्रपट सुरू असलेल्या चित्रपटगृहांवर नुकतेच अज्ञातांनी हल्ले करून शो बंद पाडले. यावरून कॅनडात भारताविरुद्ध किती द्वेष पसरला आहे, याचा अंदाज येतो. ब्रॅम्प्टन, वॉन आणि स्कारबोरो येथे या घटनांची नोंद झाली आहे.

कॅनडामध्ये, ग्रेटर टोरंटोच्या तीन वेगवेगळ्या भागात हिंदी चित्रपट दाखवणाऱ्या चित्रपटगृहांमध्ये काही मुखवटा घातलेल्या व्यक्तींनी धोकादायक फवारणी करून लोकांमध्ये दहशत पसरवल्याची घटना समोर आली आहे.

अज्ञात व्यक्तींनी काही पदार्थ फवारल्यानंतर प्रेक्षकांना बाहेर काढण्यात आले आणि त्याच्या संपर्कात आलेल्या काही लोकांवर उपचार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला ही घटना घडली असल्याचे नुकतेच समोर आले आहे. स्थानिक पोलीस आणि माध्यमांनी याबाबत माहिती दिली.

कॅनडाच्या यॉर्क प्रादेशिक पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंगळवारी रात्री 9.20 च्या सुमारास वॉन येथील सिनेमा संकुलात अशीच घटना घडली.

पोलिसांनी सांगितले की, मास्क आणि हुड घातलेल्या दोन पुरुषांनी सिनेमा थिएटरमध्ये अज्ञात, एरोसोल-आधारित पदार्थ हवेत फवारला, ज्यामुळे चित्रपट पाहणाऱ्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात खोकला लागण्याची समस्या निर्माण झाली.

Hindi Movies In Canada
Gurpatwant Singh Pannun: संसदेवर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्या पन्नूला भारत सरकारचे चोख प्रत्युत्तर; म्हणाले...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी सिनेमागृहात जवळपास 200 लोक होते. त्यावेळी सिनेमागृहात हिंदी चित्रपट दाखवला जात होता.

पोलिसांनी सांगितले की, पदार्थाच्या संपर्कात आल्यामुळे अनेकांवर उपचार करण्यात आले आणि थिएटर रिकामे करावे लागले.

या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र, पोलीस घटनास्थळी येण्यापूर्वीच संशयित पळून गेले, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Hindi Movies In Canada
Goa Tourism: उझबेकिस्तानहून पहिले चार्टर विमान गोव्यात दाखल

एका निवेदनात, सिनेप्लेक्सने म्हटले की, ते या घटनेची चौकशी करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी मिळून काम करत आहेत.

सिनेप्लेक्सच्या प्रवक्त्या मिशेल साबा म्हणाल्या, “आमचे प्राथमिक लक्ष आणि वचनबद्धता हे आमच्या प्रेक्षकांची आणि आमच्या टीमची सुरक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com