Gurpatwant Singh Pannun: संसदेवर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्या पन्नूला भारत सरकारचे चोख प्रत्युत्तर; म्हणाले...

Parliament Attack Threat: मागील काही महिन्यांपासून खलिस्तानचा मुद्दा गाजत आहे. खलिस्तानी दहशतवादी गुरुपतवंत सिंग पन्नू भारताविरुद्ध सातत्याने गरळ ओकत आहे.
Gurpatwant Singh Pannu
Gurpatwant Singh PannuDainik Gomantak

Khalistani Terrorist Gurpatwant Singh Pannun Parliament Attack Threat: मागील काही महिन्यांपासून खलिस्तानचा मुद्दा गाजत आहे. खलिस्तानी दहशतवादी गुरुपतवंत सिंग पन्नू भारताविरुद्ध सातत्याने गरळ ओकत आहे. 13 डिसेंबर रोजी संसदेवर हल्ला करण्याची धमकीही त्याने दिली आहे. दरम्यान, पन्नूच्या या धमकीला भारत सरकारने चोख प्रत्युत्तर दिले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी सांगितले की, कॅनडा आणि अमेरिकन अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे.

बागची म्हणाले की, "ज्यांना भारतात गुन्हेगारी आणि दहशतवादी कारवायांसाठी न्याय मिळवून द्यायचा आहे, त्यांनी भारतात येऊन आमच्या कायदेशीर व्यवस्थेला सामोरे जावे अशी आमची इच्छा आहे, परंतु मी पाकिस्तानमध्ये घडणाऱ्या घडामोडींवर भाष्य करु इच्छित नाही." पन्नूने अलीकडेच, भारतीय संसदेवर हल्ला करण्याची धमकी दिल्याचे वृत्त आहे. यावर बागची म्हणाले की, सरकार या धमक्यांना गांभीर्याने घेते.

बागची पुढे म्हणाले की, "आम्ही धमक्या गांभीर्याने घेतो. पण आम्ही धमक्या देणार्‍या आणि भरपूर कव्हरेज मिळवणार्‍या लोकांना जास्त एम्प्लिफाई करु इच्छित नाही. आम्ही हे प्रकरण यूएस आणि कॅनडाच्या अधिकार्‍यांकडे मांडले आहे."

Gurpatwant Singh Pannu
Gurpatwant Singh Pannun: पन्नू प्रकरणात भारताविरुद्ध खटला लढवणार 'हा' वकील; हायप्रोफाईल प्रकरणात अमेरिकन सरकारला...

दरम्यान, खलिस्तानी दहशतवादी पन्नूने नुकताच एक व्हिडिओ जारी केला होता, ज्यामध्ये तो 13 डिसेंबरला संसदेवर हल्ला करण्याची धमकी देताना ऐकू येत आहे. 13 डिसेंबर 2001 रोजी भारतीय संसदेवर हल्ला झाला होता आणि यावेळी त्याला 22 वर्षे पूर्ण झाली आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची पुढे म्हणाले की ''आम्ही विनंत्यांचे स्वरुप स्पष्ट केले आहे. आम्ही सातत्याने आमच्या मित्र देशांना दहशतवाद्यांनी दिलेल्या धमक्याबद्दल अवगत करत आहोत.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com