Bike Ambulance: नरकासूर दहनादरम्यान दुखापत झाल्यास 'बाईक ॲम्ब्युलन्स' येणार मदतीला...

पणजीसह म्हापसा, पर्वरी, फोंडा, मडगाव आणि वास्को येथे आज (11 नोव्हेंबर) संध्याकाळी 6 ते मध्यरात्री 12 या वेळेत 9 बाईक ॲम्ब्युलन्स तैनात केल्या जातील.
Narkasur In Goa
Narkasur In Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अक्राळविक्राळ नरकासुरांनी आकार घेतला आहे. नरकासूर दहनाच्या पूर्वसंध्येला सर्वजण जल्लोषात एकत्र येतात आणि मध्यरात्रीनंतर भव्यदिव्य नरकासुरांचे दहन केले जाते.

बऱ्याचदा यावेळी यावेळी अनेकजण जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ही गोष्ट लक्षात घेता दहनावेळी जर कुणाला भाजले तर त्यांंना त्वरित उपचार मिळण्यासाठी बाईक ॲम्ब्युलन्स तैनात करण्यात येणार आहेत.

Narkasur In Goa
Goa Updates: म्हापसा पार्किंग मारहाण प्रकरण; आणखी एकाला अटक

पणजीसह म्हापसा, पर्वरी, फोंडा, मडगाव आणि वास्को येथे आज (11 नोव्हेंबर) संध्याकाळी 6 ते मध्यरात्री 12 या वेळेत 9 बाईक ॲम्ब्युलन्स तैनात केल्या जातील.

या बाईक ॲम्ब्युलन्समुळे नरकासूर तसेच फटाक्यांमुळे दुखापत झालेल्यांना 108 वर संपर्क साधल्यास त्वरित मदत मिळणार आहे. जखमींना यामुळे वेळीच प्रथमोपचार मिळेल. मात्र दुखापत गंभीर असल्यास त्यांच्यासाठी रुग्णवाहिका पाठवली जाणार आहे.

माहितीनुसार, बाईक ॲम्ब्युलन्ससोबत प्रथमोपचार किट, ऑक्सिजन, ड्रेसिंग मटेरियल आणि आयव्ही फ्लुइड्सने असणार आहे. तसेच जिथे आवश्यकता असेल तिथे या बाईक ॲम्ब्युलन्स पुरवल्या जातील असे सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com