Goa Tourism: उझबेकिस्तानहून पहिले चार्टर विमान गोव्यात दाखल

मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर 64 पर्यटकांचे स्वागत
Uzbekistan Tourist Charter Flight in Goa:
Uzbekistan Tourist Charter Flight in Goa: Dainik Gomantak

Uzbekistan Tourist Charter Flight in Goa: गोव्यातील पर्यटन हंगाम आता बहरू लागला आहे. या हंगामातील उझबेकिस्तानचे पहिले चार्टर विमान आज, गुरूवारी दुपारी 12.30 वाजता मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. यातून 64 पर्यटक गोव्यात आले आहेत.

यावेळी ट्रॅव्हल एजन्सीचे पदाधिकारी तसेच गोवा पर्यटन विकास महामंडळ (जीटीडीसी) चे अधिकारी उपस्थित होते. विमानतळावर गुलाबाचे फूल देऊन ब्रास बँडसह या आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे स्वागत करण्यात आले. केक कापुनही प्रवाशांचे स्वागत करण्यात आले.

Uzbekistan Tourist Charter Flight in Goa:
Goa Sniffer Dog: गोव्याच्या मदतीला धावला पंजाबचा 'उरूस'; पेट्रोलियम पाईपलाईनमधील गळती शोधण्यास सुरवात

पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले की, "उझबेकिस्तानच्या पर्यटकांचे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे.

उझबेकिस्तानच्या सरकार आणि लोकांसोबत अशा अधिक भागीदारी करण्यासाठी, सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्यासाठी आणि आपल्या राष्ट्रांमधील पर्यटन बंध मजबूत करण्यासाठी, याला चालना देणे आवश्यक आहे."

या वेळी विमानतळासह गृह मंत्रालायचे अधिकारी, एलेन एव्हिया अँड ट्रॅव्हलचे मालक बेकझोड करीमोव आणि शेख इस्माईल उपस्थित होते.

Uzbekistan Tourist Charter Flight in Goa:
आता समुद्रातील तरंगत्या ऑफिसमधून करा 'वर्क फ्रॉम गोवा'; 5G नेटवर्कसह विविध सुविधा पुरवणार

जीटीडीसीचे दीपक नार्वेकर यांनी सांगितले की, मार्चपर्यंत परदेशी पर्यटकांच्या एकूण 60 चार्टर फ्लाईट गोव्यात येणार आहेत. गोव्यातील पर्यटनाचे प्रमोशन करण्यासाठी गोव्याचे एक शिष्टमंडळ उझबेकिस्तानात ताश्कंदला गेले होते.

स्थानिक एजंट आणि उझबेकिस्तानमधील एअरलाईन्ससोबत टायअप करून ही फ्लाईट अखेर गोव्यात दाखल झाली आहे. गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांसह अधिकाऱ्यांचेही हे यश आहे.

सुंदर साईटसीईंग आणि फूडसाठी आम्ही येथे आलो आहेत, अशी प्रतिक्रिया काही पर्यटकांनी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com