पुराचा कहर : जर्मनी आणि बेल्जियम मध्ये 70 लोकांचा मृत्यू

मृत्युची संख्या जास्तीत जास्त जर्मनीमध्ये (Germany) आढळली असून बेल्जियममध्येही (Belgium) 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
पुराचा कहर : जर्मनी आणि बेल्जियम मध्ये 70 लोकांचा मृत्यू
पुराचा कहर : जर्मनी आणि बेल्जियम मध्ये 70 लोकांचा मृत्यूDainik Gomantak
Published on
Updated on

जर्मनी (Germany) आणि बेल्जियम (Belgium) मध्ये विक्रमी पावसानंतर नद्यांच्या (River) पाणी पातळीत वाढ झाली आहे. पावसाने भयानक स्वरूप धारण केला असून या आपत्तिमुळे आतापर्यंत 70 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृत्युची संख्या जास्तीत जास्त जर्मनीमध्ये (Germany) आढळली असून बेल्जियममध्येही (Belgium) 11 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अनेक लोक गायब झाल्याची माहिती समोर अली आहे पुराचा (Flood) सर्वाधिक फटका जर्मनीतील राईसलँड-पॅलेटिनेट आणि उत्तर राईन-वेस्टफालिया या भागगात झाला आहे. यासह नेदयर्लंडमध्ये (Netherlands) सुधा परिस्थिति अत्यंत गंभीर आहे. आज संपूर्ण भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. येथील अधिकाऱ्यांच्या मते, ही आपत्ति हवामानातील बदलांचा परिणाम आहे.

पुराचा कहर : जर्मनी आणि बेल्जियम मध्ये 70 लोकांचा मृत्यू
मानवी शरीरातील ऊर्जेतून फोन होणार चार्ज

उत्तर-राईन-वेस्टफालिया प्रीमियम आर्मिन लॅसेट यांनी पावसाने बाधित झालेल्या भागाच्या दौऱ्या दरम्यान ग्लोबल वॉर्मिंगला मुख्य कारण असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले, आपल्याला वारंवार अशा परिस्थितिच सामना करावा लागणार आहे, याचा अर्थ असा की आपल्याला हवामान संरक्षणाच्या उपायांना अधिक तीव्र करण्याची गरज आहे. कारण हवामानातील बदलाचा परिणाम केवळ एका राज्यासाठी मर्यादित नाही.

तज्ञांचे म्हणणे आहे की हवामानातील बदलामुळे अशा प्रकरच्या नैसर्गिक आपत्ति येण्याची शक्यता अधिक आहे. परंतु ग्लोबल वॉर्मिंगच्या परिणामी कोणत्याही घटनेला जोडणे देखील योग्य नाही.

पुराचा कहर : जर्मनी आणि बेल्जियम मध्ये 70 लोकांचा मृत्यू
LAC वरून भारताने केली चीनची कानउघाडणी

अमेरिकेचे अध्यक्ष जो बाइडन यांच्या भेटीसाठी अमेरिकेत दाखल झालेली जर्मन चांसलर अँजेला मर्केल म्हणाली की आपत्तिमुळे तिला 'खूप मोठा धक्का बसला आहे' अँजेला मर्केल यांनी जर्मनीतील पुर परिस्थितीला आपत्ति म्हणून संबोधले आहे. त्यांनी पुरात ज्या लोकांनी जीव गमावला आहे त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहे. पुढे त्या म्हणाल्या की, लोकांचा मृत्यूमुळे सर्वत्र दुखचे वातावरण निर्माण झाले आहे.

ते म्हणाले , 'माझे विचार तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही यावर विश्वास ठेवू शकता. आमचे सरकार लोकांच्या जीवनाचे रक्षण करण्यासाठी तसेच धोक्याचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि अशा संकटांना दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल यावर तुम्ही विश्वास ठेऊ शकता.' जर्मनीमध्ये पुरात अडकलेल्यांना मदत करण्यासाठी पोलिस ,हेलिकॉप्टर आणि शेकडो सैनिक तैनात करण्यात आले आहेत.

पुराचा कहर : जर्मनी आणि बेल्जियम मध्ये 70 लोकांचा मृत्यू
बिछडे तो जिना पाये ! 24 वर्षानंतर बाप अन् मुलाची भेट

जर्मनीतील पश्चिमेला शाळा बंद केल्या आहे. या भागातील वाहतूक खोळंबली आहे. जर्मन ब्रॉडकास्टर एसडब्ल्यूआरच्या म्हणण्यानुसार, पहाडी आयफेल प्रदेशातील शुड बी अडेनौ जिल्ह्यात जवळपास 25 घरे असून ती कोणत्याही क्षणी कोसळू शकतात. या भागात आपत्कालीन परिस्थिति घोषित करण्यात आली आहे.

काही भगत याचा परिणाम एवढा झाला आहे की येथील भाग कापला गेला आहे. यामुळे तेथे आता नावेतून देखील पोहोचणे कठीण झाले आहे. या आपत्तीला घाबरून गेल्याचे या भागातील लोकांनी वृतसंस्था एफएफपीला सांगितले आहे. '

रस्त्यावरील गाड्या वाहून गेल्या आहेत. येथील मोठ मोठी झाडे कोसळली आहेत. ब्रसेल्स आणि अँटवर्प नंतर बेल्जियममधील तिसरे सर्वात मोठे शहर असलेल्या लीगला खाली करण्याचे आदेश दिले आहे . स्थानिक अधिकाऱ्यांनी चेतावणी जारी केली की , ज्यांना दुसऱ्या ठिकाणी जाता येत नाही ,अशा लोकांनी त्यांच्या घरच्या मजल्यावर किंवा छतावर जावे.

पुराचा कहर : जर्मनी आणि बेल्जियम मध्ये 70 लोकांचा मृत्यू
पाकिस्तानात बॉम्ब स्फोट, 6 चिनी नागरिकांसह 8 जणांचा मृत्यू

या शहरातून वाहणारी म्युसेझ नदीची पातळी आधीच अधिक होती आणि आता याची पातळी सुमारे 1.5 मिटरणे वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. येथील धारणावरील पूल कोसळल्याबद्दल अधिकाऱ्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी लोकांना अधिक मदत करण्याचे आवाहन केले आहे.

गुरुवारी बेल्जियमच्या पॅपिन्स्टर या शहरातून एका मोठ्या ट्रकमधून लोकांना बाहेर काढण्यात येत होते. परंतु परिस्थिति खूपच बिकट असल्याने लोकांना बाहेर काढण्याचे काम थांबविण्यात आले आहे.

नेदरलँडमध्ये कोणाचाही मृत्यू झाल्याची नोंद झालेली नाही. परंतु नदीलागत असणारे शहर आणि खेड्यातील लोकांना लवकरात लवकर त्यांची घरे सोडण्याचे आवाहन केले आहे .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com