पाकिस्तानात बॉम्ब स्फोट, 6 चिनी नागरिकांसह 8 जणांचा मृत्यू

चिनी अभियंते असलेल्या बसमध्ये मोठा स्फोट झाला. अप्पर कोहकिस्तानमध्ये हा स्फोट झाला असून ही घटना आज सकाळी घडली आहे.(Pakistan)
Pakistan bus blast kills eight, including six Chinese
Pakistan bus blast kills eight, including six ChineseTwitter @Kashmiruk_kot
Published on
Updated on

उत्तर पाकिस्तानमध्ये(Pakistan) चिनी अभियंता घेऊन जाणाऱ्या बसमध्ये झालेल्या स्फोटात 8 जण ठार झाले आहेत.या बसमध्ये चार चिनी नागरिक होते . बसमधील हा स्फोट फक्त चीनी नागरिकांना लक्ष्य करण्यासाठी करण्यात आला असल्याचे समजत आहे. रॉयटर्सने विविध स्रोतांचा हवाला देत असे सांगितले की, चिनी अभियंते असलेल्या बसमध्ये मोठा स्फोट झाला. अप्पर कोहकिस्तानमध्ये हा स्फोट झाला असून ही घटना आज सकाळी घडली आहे.

यात आठ जणांचा मृत्यू झाल्याचे हजारा परिसरातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यांनी सांगितले की ही बस अप्पर कोहकिस्तानच्या दायू धरणाच्या जागी जवळपास 30 चिनी अभियंत्यांसह जात होती. या अपघातात चिनी अभियंता व्यतिरिक्त दोन संसदीय सुरक्षा कर्मचारीही मरण पावले आहेत.

Pakistan bus blast kills eight, including six Chinese
'तालिबानी' संकट, अफगाणिस्तानात परराष्ट्रमंत्र्यांची महत्वाची बैठक

दासू जलविद्युत प्रकल्प हा चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरचा एक भाग आहे. बीजिंगने उभारलेल्या बेल्टा रोड इनिशिएटिव्हवर चीन सुमारे 65 अब्ज डॉलर्स खर्च करत आहे. हा प्रकल्प चीनच्या दक्षिणेस असलेल्या ग्वादर बंदराशी थेट चीनला जोडतो.दायू जलविद्युत प्रकल्पात मोठ्या संख्येने पाकिस्तानी कामगार काम करतात त्याचबरोबर मोठ्या संख्येने चिनी अभियंतादेखील बर्‍याच दिवसांपासून येथे कामासाठी आहेत.

पाकिस्तानमध्ये चीनकडून बांधल्या जात असलेल्या विविध प्रकल्पांच्या संदर्भात चिनी नागरिक मोठ्या संख्येने पाकिस्तानात वास्तव्य करीत आहेत. तथापि, काही ठिकाणी चीनने सुरू केलेल्या विविध प्रकल्पांविषयी लोकांमध्ये संताप आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की यापूर्वी चिनी नागरिकांवर लक्ष्य ठेवून अनेक वेळा हल्ले केले गेले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com