Scientists develop strip capable of charging smartphones with human energy
Scientists develop strip capable of charging smartphones with human energyDainik Gomantak

मानवी शरीरातील ऊर्जेतून फोन होणार चार्ज

कॅलिफोर्निया विद्यापीठातील वैज्ञानिकांच्या पथकाने फोन चार्जे करण्यासाठी एक नवीन शोध लावला आहे
Published on

कॅलिफोर्निया(California) विद्यापीठातील वैज्ञानिकांच्या(Scientist) पथकाने फोन चार्जे (Phone Charging)करण्यासाठी एक नवीन शोध लावला आहे. त्यांनी एक स्ट्रिप केबल विकसित केली असून, जी मानवी शरीरात निर्माण होणारी उर्जा(Human Energy) वापरुन स्मार्टफोन आणि घड्याळे चार्ज करण्यास मदत करते.

सॅन डिएगो आणि त्यांच्या टीमने याचा शोध लावला आहे. या अभ्यासामध्ये भाग घेणाऱ्या संशोधकांनी असा दावा केला आहे की, दहा तास झोपेच्या वेळीही ही स्ट्रिप केबल परिधान केल्याने वॉच सारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे २४ तास चालू शकतात. बाजारपेठेत या स्ट्रिप उपलब्ध आहेत. व्यायाम करताना आपल्याला घाम येतोच त्यावेळी देखील ही स्ट्रिप घातल्यास फोन चार्ज होऊ शकतो. किंवा सूर्यप्रकाशासारख्या बाह्य स्रोतांवर देखील याव्दारे चार्ज करता येऊ शकते. हे नवीन डिव्हाइस झोपेत असतानाही स्मार्टफोन आणि घड्याळे चार्ज करता येतील. जेव्हा वापरकर्त्याने तो खाली दाबला किंवा वापरकर्त्याला घाम फुटू लागला तेव्हा डिव्हाइस बोटाभोवती चिकट प्लास्टरसारखे बसते.

Scientists develop strip capable of charging smartphones with human energy
हिऱ्यामध्ये हिरा ! 80 करोड वर्ष जुन्या हिऱ्यांचा शोध

ही स्ट्रिप परिधान करणार्‍यांकडून कोणत्याही प्रकारचे शारीरिक इनपुट त्याला द्यावे लागणार नाही. हे दररोजच्या व्यक्तीसाठी घालण्यायोग्य अधिक व्यावहारिक, सोयीस्कर आणि सुलभ बनविण्यात आले आहे. असे एक डॉक्टरेट विद्यार्थी आणि सह-लेखक लू यिन यांनी सांगितले आहे. यिन यांनी बोटांच्या टोकाचा उपयोग करण्याऱ्या या अविष्काराबद्दल बोलताना अधिक कौतुक केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com