बिछडे तो जिना पाये ! 24 वर्षानंतर बाप अन् मुलाची भेट

चीनच्या शेनडोंग प्रांतमध्ये राहत असलेल्या गुओ गैंगटन (Guo Gangton) यांच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं.
Guo Gangton
Guo GangtonDainik Gomantak
Published on
Updated on

आई-बापासांठी मुले ही त्यांच्या आयुष्याचा आधार असतात. मुलांचं पालनपोषण करणे, त्यांना वाढवणं, त्यांच्यासाठी आपल्या आयुष्याचा त्याग करणं ही इतिकर्तव्ये आई वडील पार पाडत असतात. मात्र यातच काही कारणांनी त्याच आई वडिलांचा मुलगा हरवला आणि बऱ्याच वर्षांनी त्यांना भेटला तर त्यांच्यासाठी ही अत्यानंदाची पर्वणी असणार. अशीच एक घटना शेजारी असणाऱ्या चीनमध्ये (China) घडली आहे. एका चीनी बापाला आपल्याच मुलाला भेटायला तब्बल 24 वर्षे लागली. आश्चर्य करायला लावणारी गोष्ट म्हणजे त्या बापाने आपल्या मुलाला शोधण्यासाठी सुमारे पाच लाख किमी. चा प्रवास केला.

चीनच्या शेनडोंग प्रांतमध्ये राहत असलेल्या गुओ गैंगटन (Guo Gangton) यांच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांचा मुलागा अवघ्या दोन वर्षांचा होता. या अपहरणावर पुढे चीनमध्ये 2015 मध्ये चित्रपट काढण्यात आला होता. "हांगकॉंगचा सुपरस्टार एंडी लाऊ ने या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारली होती. चीनमध्ये मुलांच्या अपहरणाची एक मोठी समस्या आहे. ग्लोबल टाइम्सच्या अहवालाचा अभ्यास, डीएनए टेस्टिंगच्या आधारे गुओ गैंगटन यांच्या मुलाची ओळख पटली. दरम्यान चीनी पोलिसांनी अनेक लोकांना ओळख पटवण्यासाठी आपल्या ताब्यात घेतले होते.

Guo Gangton
China: 3 वर्षावरील मुलांचं होणार लसीकरण; 'करोनाव्हॅक' लसीला दिली मंजूरी

1997 मध्ये अपहरण झालं होत मुलाचं

चीनी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, एक जोडपे एकमेकांना डेट करत होते. या दोघांनी गुओ गैंगटन यांच्या मुलाचं अपहरण करुन जास्तीत जास्त पैसे कमावणे हा त्यांचा मुख्य हेतू होता. घराबाहेर खेळत असणाऱ्या या लहान बालकाला अपहरण करुन चीनमधीलच हैनान प्रांतामध्ये ते दोघे घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी या लहान मुलाला कौडीमोल पैशाला विकून टाकले. गुओ गैंगटन यांच्या मुलाचं 1997 मध्ये अपहरण झालं होतं. त्यानंतर गुओ ने आपल्या मुलाच्या शोधात मोटरबाइकवर चीनमधील 20 प्रांतात शोध घेण्यासाठी मोहीम आखली. या दरम्यान अनेक वेळा त्यांना शारिरीक इजाही झाली. काही ठिकाणी त्यांची जवळ असणाऱ्या साहित्यांची चोरीही झाली 10 मोटरबाइकला हानी देखील पोहोचली.

Guo Gangton
China: झिनजियांगमधील लोकसंख्या 48 टक्यांनी घटली; उइगर मुस्लिमांवर अत्याचारात वाढ  

दरवर्षी 20 वर्षात चीनमध्ये अगणित मुले

गुओ गैंगटन यांनी मुलाच्या शोधावेळी बॅनरदेखील बनवले होते. ते म्हणाले की, त्यांनी आपल्या मुलाच्या शोधासाठी पूर्ण आयुष्य पणाला लावले. ते या दरम्यान पुलाच्या खाली झोपत आणि ज्यावेळी त्यांच्याजवळचे पैसे संपले त्यावेळी त्यांनी लोकांकडून भिक मागून आपला उदरनिर्वाह चालवला. या काळात गुओ चीनमध्ये गायब झालेल्या लोकांच्या संघटनेतील मुख्य सदस्यही बनले. त्यांनी या काळात गायब झालेल्या सात मुलांची भेट त्यांच्या आई वडिलांशी घालून दिली. चीनमध्ये मुलांचं अपहरण आणि तस्करीची मोठी समस्या आहे. 2015 वर्षात चीनमध्ये 20 मुलांची तस्करी झाली आहे. यामध्ये अधिकतम मुलांना विकून टाकण्यात आले.

Guo Gangton
Indian-China Border Issue : भारत-चीन दरम्यान आज पॅगोंग विषयी बैठक

मुलाच्या भेटीनंतर गुओ यांनी दिला संदेश

स्थानिक माध्यमांकडून सांगण्यात आले की, गुओ यांचा मुलगा हैनान प्रांतामध्ये राहत नाही. थोडक्यात, जेव्हा गुओ आणि त्यांच्या पत्नीला आपल्या मुलाबद्दल समजले त्यावेळी त्यांच्या आनंदाचा पारावार उरला नाही.ज्यावेळी त्यांची प्रत्यक्षात भेट झाली त्यावेळी त्यांनी गळाभरुन भेट घेतली. यावेळी त्यांच्या डोळ्यांमध्ये आनंदअश्रू होते. सोशल मिडियावर गुओ यांना मुलाच्या भेटीसाठी लोकांनी संदेश पाठवले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com