Viral Video: चिलीच्या जंगलांमध्ये भीषण वणवे; रस्त्यावर सापडताहेत मृतदेह, पाहा चिमुकल्याच्या सुटकेचा थरारक व्हिडिओ

Chile Wildfire: चीलीच्या मध्य आणि दक्षिण भागात 92 जंगलात वणवे पेटले आहेत. सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे ही आग दाट लोकवस्तीच्या भागात पसरत आहे.
Chile Wildfire Viral Video
Chile Wildfire Viral Video
Published on
Updated on

Fierce wildfires in Chilean forests; Dead bodies are found on the streets, 1100 houses are in ashes:

दक्षिण अमेरिकन देश चिलीच्या जंगलात लागलेल्या  वणव्यात 64 लोकांचा मृत्यू झाला, तर 1100 हून अधिक घरे राख झाली. आपत्कालीन सेवा विभाग हेलिकॉप्टर आणि ट्रकच्या मदतीने शहरी भागातील वणवा विझवण्याचा प्रयत्न करत आहे.

यामध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणात लोक दगावले असून त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सुमारे 1 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या मध्य चिलीच्या वलपरिसो प्रदेशातील अनेक भाग काळ्या धुराने व्यापले आहेत.

विना डेल मार या किनारी शहराच्या आजूबाजूचे भाग या वणव्यामुळे सर्वात जास्त प्रभावित झाले आहेत.

गृहमंत्री कॅरोलिना तोहा यांनी सांगितले की, वालपरिसोमधील परिस्थिती सर्वात गंभीर आहे. रस्त्यांवरही लोकांचे मृतदेह सापडत आहेत.

2010 च्या भूकंपानंतर चिलीमधील ही सर्वात मोठी आपत्ती आहे. त्यावेळी भूकंपामुळे सुमारे 500 लोकांचा मृत्यू झाला होता.

Chile Wildfire Viral Video
Highest Traffic Jam: जगातील सर्वाधिक ट्रॅफिक जॅम असलेल्या शहरांची यादी जाहीर; टॉप 10 मध्ये बंगळुरु अन् पुणे

अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक यांनी एका दूरचित्रवाणी भाषणात सांगितले की परिस्थिती खूप कठीण आहे. सध्या हा वणवा ४३ हजार हेक्टरवर पसरला आहे.

अहवालानुसार, शहरातील डोंगराळ भाग असलेल्या व्हिला इंडिपेंडेनियातही भीषण वणवा पेटला आहे. जळालेल्या गाड्या रस्त्यावर उभ्या असलेल्या दिसत आहे.

Chile Wildfire Viral Video
ना दात घासतो ना आंघोळ... पत्नीची घटस्फोटासाठी कोर्टात धाव; न्यायाधीशांनी दिला धक्कादायक निर्णय

चीलीच्या मध्य आणि दक्षिण भागात 92 जंगलात वणवे पेटले आहेत. सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे ही आग दाट लोकवस्तीच्या भागात पसरत आहे. त्यामुळे लोक, घरे आणि सुविधांवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.

चिलीमध्ये उन्हाळ्यात जंगलात वणवे पेटणे सामान्य आहे. गेल्या वर्षी विक्रमी उष्णतेच्या वेळी पेटलेल्या वणव्यात 27 लोकांचा मृत्यू झाला आणि 400,000 हेक्टरपेक्षा जास्त जमीन प्रभावित झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com