ना दात घासतो ना आंघोळ... पत्नीची घटस्फोटासाठी कोर्टात धाव; न्यायाधीशांनी दिला धक्कादायक निर्णय

Turkey Court: सामान्यत: घरगुती हिंसाचार, दुसऱ्याशी संबंध, मद्यपान आणि अंमली पदार्थांचे व्यसन ही पती-पत्नीमधील घटस्फोटाची कारणे बनतात.
Court
CourtDainik Gomantak

Turkey Court: सामान्यत: घरगुती हिंसाचार, दुसऱ्याशी संबंध, मद्यपान आणि अंमली पदार्थांचे व्यसन ही पती-पत्नीमधील घटस्फोटाची कारणे बनतात. पण तुम्ही कधी ऐकले आहे का की एका महिलेने पती गलिच्छ राहतो म्हणून घटस्फोट मागितला आहे? हो हे खरे आहे! तुर्कस्तानमधील एक महिला आपला पती स्वच्छता राखत नसल्याने वैतागली होती. सतत विरोध करुनही पतीने आपल्या सवयी सोडल्या नाहीत. दरम्यान, पतीच्या वाईट सवयींविरोधात महिलेने न्यायालयात धाव घेतली.

दरम्यान, पतीच्या घाणेरड्या सवयीमुळे महिला नाराज होती. महिलेचा आरोप आहे की, तिचा नवरा दात घासत नाही आणि आंघोळही करत नाही. यालाच वैतागून पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी महिलेने न्यायालयात धाव घेतली. ती महिला आपल्या पतीच्या वाईट सवयींना कंटाळली होती आणि तिला घटस्फोट हवा होता. तुर्की मीडियाच्या मते, महिलेने दावा केला की, तिचा नवरा क्वचितच आंघोळ करतो, परिणामी शरीराला सतत दुर्गंधी येते आणि तो आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच दात घासतो.

Court
Turkey Blast: तुर्कीच्या संसदेजवळ आत्मघातकी हल्ला, हल्लेखोराने स्वतःला उडवले; दुसरा गोळीबारात ठार!

दुसरीकडे, महिलेच्या वकिलाने न्यायालयात साक्षीदार हजर केले. या साक्षीदारांनी महिलेचा पती वैयक्तिक स्वच्छता ठेवत नसल्याचे सांगितले. दरम्यान, महिलेच्या अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला. इतकेच नाही तर न्यायालयाने पतीला पत्नीला त्रास दिल्याबद्दल नुकसानभरपाई म्हणून 500,000 तुर्की लिरा देण्याचे आदेश दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com