Highest Traffic Jam: जगातील सर्वाधिक ट्रॅफिक जॅम असलेल्या शहरांची यादी जाहीर; टॉप 10 मध्ये बंगळुरु अन् पुणे

Bengaluru Pune Highest Traffic Jam In Year 2023: ट्रॅफिक जाम ही प्रत्येकाला भेडसावणारी समस्या आहे. यामुळे वेळेबरोबर इंधनही वाया जाते.
Highest Traffic Jam In Year 2023
Highest Traffic Jam In Year 2023Dainik Gomantak

Bengaluru Pune Highest Traffic Jam In Year 2023: ट्रॅफिक जाम ही प्रत्येकाला भेडसावणारी समस्या आहे. यामुळे वेळेबरोबर इंधनही वाया जाते. नुकतीच, जगातील सर्वाधिक ट्रॅफिक जाम असलेल्या शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तुम्हाला माहिती आहे का की भारतातील कोणत्या शहरात सर्वाधिक ट्रॅफिक जाम आहे? ही शहरे दिल्ली किंवा मुंबई नाहीत... दरम्यान, ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये वाहने सर्वात कमी वेगाने जातात, असे एका अहवालातून समोर आले आहे. लंडनमधील वाहन चालवण्याचा सरासरी वेग ताशी 2023 मध्ये 14 किलोमीटर होता. लंडननंतर डब्लिन, टोरंटो, मिलान आणि लिमा यांचा क्रमांक लागतो. भारतातील बंगळुरु आणि पुणे अनुक्रमे 6 व्या आणि 7 व्या स्थानावर आहेत. त्यानंतर बुखारेस्ट, मनिला आणि ब्रसेल्सचा क्रमांक लागतो.

त्याचवेळी, भारतातील बंगळुरु आणि पुणे या शहरामध्ये वाहतूक कोंडी ही मोठी समस्या आहे. या यादीत बंगळुरु सहाव्या स्थानावर आहे. इथे प्रत्येक 10 किलोमीटरसाठी लागणारा सरासरी वेळ 28 मिनिटे 10 सेकंद होता. तर पुण्यात 10 किमीसाठी सरासरी 27 मिनिटे 50 सेकंद लागला होता. अशाप्रकारे पुणे सातव्या क्रमांकावर पोहोचले. अहवालात म्हटले आहे की, 27 सप्टेंबर हा बंगळुरुमधील प्रवासासाठी सर्वात वाईट दिवस होता. या दिवशी इथे 10 किमीच्या प्रवासासाठी सरासरी 32 मिनिटे लागली होती. 8 सप्टेंबर रोजी पुण्यात सर्वाधिक वाहतूक कोंडी झाली होती. त्या दिवशी 10 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी सरासरी 34 मिनिटे लागली होती.

Highest Traffic Jam In Year 2023
China Economy: चीनी अर्थव्यवस्थेला घरघर, शेअर मार्केट पडलं थंड; 3 वर्षात 6 ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान

दिल्ली-मुंबईची स्थिती काय होती?

टॉमटॉम (TOM2) ट्रॅफिक इंडेक्सने हे संशोधन केले आहे. यासाठी 55 देशांतील 387 शहरांची निवड करण्यात आली होती. यामध्ये लाखो किलोमीटरच्या प्रवासाचा तपशील गोळा करण्यात आला. 2023 मध्ये, आयर्लंडची राजधानी डब्लिन नंतर बंगळुरु हे सर्वात जास्त गर्दीचे शहर होते. या अहवालात राष्ट्रीय राजधानी दिल्ली 44 व्या तर मुंबई 52 व्या स्थानावर आहे. यापूर्वी एका अभ्यासात असे आढळून आले होते की, बंगळुरुला ट्रॅफिक जाममुळे दरवर्षी 20 हजार कोटी रुपयांचे नुकसान होते. शहरात 60 उड्डाणपूल असूनही वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com