Goa Fire: वणवे शेकडो वर्षांची वनसंपदा नष्ट करतात- सयाजी शिंदे

हिमालयाप्रमाणे जुना सह्याद्री वाचविणे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य
Goa Fire
Goa FireDainik Gomantak

Goa Fire सह्याद्री केवळ झाडाझुडपांचे निमहरित जंगल नाही. तर हिमालयापेक्षा जुना समृद्ध, संपन्न आणि दुर्मीळ असा जैवविविधतेचा ठेवा आहे. तिला वणवा लावू नका आणि लागलाच तर त्वरित त्यावर नियंत्रण ठेवा. सह्याद्री वाचली पाहिजे, जगवली पाहिजे हे आपल्या सर्वांचे आद्यकर्तव्य आहे, असे मत सह्याद्री देवराईचे प्रवर्तक आणि अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

अभिनेते सयाजी शिंदे आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून सह्याद्री देवराईचे काम करतात. गाव तिथे ‘देवराई’ या संकल्पनेनुसार सध्या ते महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकमध्ये सक्रिय आहेत.

देवराई जपण्याबरोबरच जलसंधारणाच्या माध्यमातून ‘पाणी आडवा पाणी जिरवा’च्या सहकार्याने देशी वृक्षांची लागवड, त्यातून स्थानिकांना आत्मनिर्भर बनविणे यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत. सध्या राज्यातल्या जंगलांमध्ये सुरू असलेल्या वणव्यांमुळे ते अस्वस्थ आहेत.

वणवे शेकडो वर्षांची जैवविविधता नष्ट करतात. अनेक प्राणीपक्ष्यांचे कुटुंब उद्‌ध्वस्त करतात. त्यांना जगण्याचा अधिकार आहे. जितकी वनसंपदा नष्ट झाली तितकी नव्याने उभारण्यासाठी प्रयत्न करा, असा त्यांचा सल्ला आहे.

Goa Fire
Goa Fire: पूर्वेकडील वणव्यांवर नियंत्रण आणण्यात यश

निसर्गसंवर्धनासाठी आपल्या पूर्वजांनी देवराया राखून ठेवल्या होत्या. त्यात मोठ्या प्रमाणामध्ये वनऔषधी आहेत. याशिवाय जांभूळ, सिताफळ, आंबा, बोर, चिंच यासारखी महत्त्वाची फळ आहेत.

जी माणसाबरोबर पक्षी आणि प्राण्यांना उपयुक्त ठरतात. त्यामुळे अशा वनराई वाचल्या पाहिजे. याबरोबरच आपल्या परिसरातील जंगलांचे संवर्धन झाले पाहिजे. यासाठीच आम्ही सह्याद्री वनराई चळवळ सुरू केली आहे . - सयाजी शिंदे, अभिनेता-प्रवर्तक, सह्याद्री देवराई

Goa Fire
Goa News: वराहांचे 100 किलो मांस जप्‍त

देशी प्रदेशनिष्ठ वनस्पतींना झळ

आपल्याकडे लागणारे वणवे हे देशी, प्रदेशनिष्ठ वनस्पतींना मारक ठरतात. झुडूपवर्गीय वनस्पती, वन्य जनावरांसाठी अत्यावश्यक असलेले गवतवर्गीय वनस्पती, ऑर्किड यांना या वणव्याची झळ बसते. याबरोबरच दुर्गम सडे, माळरानावरील पक्षी, सरपटणारे प्राणी आगीच्या भक्ष्यस्थानी पडतात, असे सयाजी शिंदे आवर्जून सांगतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com