Europe Heatwave: युरोपमध्ये भीषण उष्णतेचा कहर! फ्रान्समध्ये 1000 हून अधिक मृत्यू; 'ग्लोबल वॉर्मिंग'मुळे परिस्थिती गंभीर

France Heatwave Death Toll Spikes Paris: गेल्या आठवड्यात आलेल्या भीषण उष्णतेच्या लाटेदरम्यान अवघ्या तीन दिवसांत फ्रान्समध्ये सुमारे 1000 हून अधिक मृत्यूंची नोंद झाली.
France Heatwave Death Toll Spikes Paris
Europe HeatwaveDainik Gomantak
Published on
Updated on

France Heatwave Death Toll Spikes Paris: युरोपमध्ये सध्या वाढते तापमान जीवघेणे ठरु लागले आहे. फ्रान्सच्या राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य संस्थेने रविवारी (28 जून) प्रसिद्ध केलेल्या एका धक्कादायक रिपोर्टनुसार, गेल्या आठवड्यात आलेल्या भीषण उष्णतेच्या लाटेदरम्यान अवघ्या तीन दिवसांत फ्रान्समध्ये सुमारे 1000 हून अधिक मृत्यूंची नोंद झाली. या धक्कादायक आकडेवारीने सरकार आणि आरोग्य यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत.

यामध्ये सर्वाधिक फटका पॅरिस परिसराला बसला असून, तिथे एकट्या राहणाऱ्या वृद्ध नागरिकांनी आपल्या घरातच दम तोडल्याचे समोर आले. रेसिडेंशियल केअर सेंटर्स आणि घरांमध्ये झालेल्या मृत्यूंची अचूक आकडेवारी अजून येणे बाकी असल्याने हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

France Heatwave Death Toll Spikes Paris
US Europe Trade War: ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! युरोपियन युनियनसोबतचा मोडला व्यापार करार; नव्या व्यापार युद्धाचा उडणार भडका

उष्णतेचा हा कहर केवळ फ्रान्सपुरता (France) मर्यादित नसून जर्मनी, इटली आणि पोलंड या देशांनाही उष्णतेने आपल्या कवेत घेतले आहे. या देशांमध्ये पारा 40 अंश सेल्सिअसच्या पार जाण्याची शक्यता हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवली. या भयावह परिस्थितीवर जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अदनोम घेब्रेयसस यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. 'X' वर इशारा देताना ते म्हणाले की, हवामान बदल आणि 'ग्लोबल वॉर्मिंग'मुळे पूर्वी कधीतरी येणारी उष्णतेची लाट आता दरवर्षी येत आहे.

France Heatwave Death Toll Spikes Paris
Europe: भारतासारखीच 'या' देशात आहे 100 वर्षांहून अधिक जुनी परंपरा, जाणून घ्या

अत्यंत वाढलेले तापमान हे एक 'सायलेंट किलर' असून युरोपमधील घरे, कार्यालये आणि शाळा एवढ्या मोठ्या प्रमाणातील रेकॉर्डतोड तापमान सहन करण्यासाठी बनवलेल्या नाहीत. 21 जूनपासून आतापर्यंत संपूर्ण युरोपमध्ये उष्णतेमुळे 1300 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. 'वर्ल्ड वेदर ॲट्रिब्यूशन'च्या शास्त्रज्ञांनुसार, मानवी हस्तक्षेपामुळे झालेल्या हवामान बदलाशिवाय युरोपमध्ये अशी जीवघेणी उष्णता येणे अशक्य होते.

France Heatwave Death Toll Spikes Paris
Heatwaves In Europe: उष्म्यामुळे दरवर्षी 90,000 युरोपियन्स जीवाला मुकणार

दुसरीकडे, जर्मनी आणि चेक रिपब्लिकमध्येही उष्णतेचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघाले आहेत. जर्मनीच्या मॉकर्न-ड्रैविट्झमध्ये दिवसाचे तापमान 41.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर रात्रीचे तापमानही 29.4 अंशाच्या खाली आले नाही. या प्रचंड उष्णतेमुळे जर्मनीतील जंगलांना भीषण आग लागली. चेक रिपब्लिकच्या डोक्सानी शहरात पारा 41.1 अंशावर पोहोचला. बर्लिनमध्ये नागरिकांना थंडावा देण्यासाठी पोलिसांना वॉटर कॅननचा वापर करावा लागला, तर एसी निकामी झालेल्या एका ट्रेनमधील 600 प्रवाशांना खिडक्या आणि दरवाजे तोडून बाहेर काढावे लागले. एकूणच, युरोपमधील हा निसर्गाचा कोप संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com