Trump Tariff Policy: ट्रम्प यांची ‘टॅरिफ’ पॉलिसी फसली! अमेरिकेत वाढली बेरोजगारी, महागाईनेही गाठला नवा उच्चांक

America Unemployment: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात पहिल्या सात महिन्यांतच देशातील रोजगार बाजारपेठेची स्थिती खालावली आहे.
Trump Tariff Policy
Donald TrumpDainik Gomantak
Published on
Updated on

America Unemployment: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात पहिल्या सात महिन्यांतच देशातील रोजगार बाजारपेठेची स्थिती खालावली आहे. नवीन नोकऱ्यांची निर्मिती थांबली असून महागाई पुन्हा वाढू लागली आहे. ट्रम्प यांनी भारत आणि इतर देशांवर लावलेल्या आयात शुल्कामुळे (Tariff Policy) हे परिणाम समोर आल्याचे म्हटले जात आहे.

नोकरीच्या आघाडीवर निराशाजनक आकडेवारी

शुक्रवारी (13 सप्टेंबर) जाहीर झालेल्या ऑगस्ट महिन्याच्या जॉब्स रिपोर्टनुसार, अमेरिकेत केवळ 22,000 नवीन नोकऱ्यांची निर्मिती झाली, जी अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे. त्याचबरोबर, बेरोजगारीचा (Unemployment) दर वाढून 4.3% वर पोहोचला आहे, जो गेल्या 4 वर्षांतील सर्वाधिक दर आहे.

ट्रम्प यांच्या धोरणांचा थेट परिणाम रोजगार बाजारपेठेवर झाल्याचे दिसून येत आहे. जून महिन्यात अमेरिकेतून 13,000 नोकऱ्या गायब झाल्या, जी डिसेंबर 2020 नंतरची पहिली मासिक घट आहे. उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) आणि बांधकाम (कन्स्ट्रक्शन) या क्षेत्रांमध्ये नोकरीमध्ये मोठी घट झाली आहे. एप्रिल महिन्यात ट्रम्प यांनी आपल्या टॅरिफ धोरणामुळे नोकऱ्या आणि उद्योग अमेरिकेत परत येतील, असा दावा केला होता. मात्र, त्यानंतर उत्पादन क्षेत्रात 42,000 आणि बांधकाम क्षेत्रात 8,000 नोकऱ्या कमी झाल्या आहेत.

Trump Tariff Policy
Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

ट्रम्प यांनी त्यांच्या 2024 च्या निवडणूक प्रचारात अर्थव्यवस्था नवीन उंचीवर नेण्याचे आश्वासन दिले होते. पण, आजची परिस्थिती पाहता अर्थव्यवस्था मंदावलेली दिसत आहे. त्यांनी तेल उद्योगाला ‘लिक्विड गोल्ड’ म्हटले होते, पण याच तेल आणि वायू क्षेत्रातूनही 12,000 नोकऱ्या कमी झाल्या आहेत.

महागाई वाढल्याने सरकारची चिंता वाढली

ट्रम्प यांनी पहिल्या दिवसापासून महागाई संपवण्याचे आणि विजेचे दर निम्मे करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, एप्रिलमधील 2.3% असलेली वार्षिक महागाई दर जुलैमध्ये वाढून 2.7% झाला आहे. विजेचे दरही या वर्षात 4.6% ने वाढले आहेत. ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे वॉलमार्ट आणि प्रॉक्टर अँड गँबल सारख्या कंपन्यांना त्यांच्या वस्तूंच्या किमती वाढवण्यास भाग पाडले आहे.

खराब आर्थिक आकडेवारीसाठी ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल यांना जबाबदार धरले. त्यांचे म्हणणे आहे की, जर व्याजदर कमी केले असते तर नोकऱ्या वाढल्या असत्या. मात्र, आर्थिक तज्ञांच्या मते, एवढ्या लवकर व्याजदर कमी केल्यास महागाई आणखी वाढू शकते.

Trump Tariff Policy
Donald Trump: आयातशुल्काचा धक्का, भारतावर 25 टक्के कराची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, दंड देखील आकारणार

आप्रवासन धोरणांचा परिणाम

ट्रम्प यांनी त्यांच्या प्रचार मोहिमेत बेकायदेशीर आप्रवाशांना बाहेर काढल्यास 'ब्लॅक जॉब्स' सुरक्षित राहतील, असा दावा केला होता. परंतु, सध्या ब्लॅक समुदायातील बेरोजगारीचा दर 7.5% पर्यंत पोहोचला आहे, जो ऑक्टोबर 2021 नंतरचा सर्वाधिक आहे. त्यांची कठोर आप्रवासन धोरणे कुशल कामगारांची कमतरता वाढवत आहेत, ज्यामुळे रोजगार बाजारपेठेवर नकारात्मक परिणाम होत आहे.

मागील महिन्यात खराब जॉब रिपोर्ट आल्यानंतर ट्रंप यांनी ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्स (BLS) च्या कमिशनर एरिका मॅकएंटारफर यांना पदावरुन काढून टाकले होते. त्यांनी कोणताही पुरावा न देता असा दावा केला होता की आकडेवारी त्यांच्या विरोधात ‘फेरफार’ (Manipulated) करण्यात आली आहे.

Trump Tariff Policy
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प Apple CEO टिम कुक यांना सांगतायेत, 'भारतात कारखाने उभारण्याची गरज नाही'

जाब विचारला जातोय

व्हाइट हाऊसचे आर्थिक सल्लागार केविन हॅसेट यांनी ऑगस्टचा डेटा एक अपवाद असल्याचे सांगत अर्थव्यवस्था लवकरच पूर्वपदावर येईल असा दावा केला आहे. त्यांनी अटलांटा फेडरल रिझर्व्हने 3% तिमाही वाढीची अपेक्षा व्यक्त केली असल्याचा संदर्भ दिला आहे. परंतु, बाइडन प्रशासनाचे माजी अधिकारी डॅनियल हॉर्नुंग यांनी ऑगस्टच्या आकडेवारीतून कोणत्याही रिकव्हरीचे संकेत मिळत नसल्याचे म्हटले आहे. प्रोग्रेसिव्ह सेनेटर एलिझाबेथ वॉरेन यांनी, ‘ट्रम्प यांची धोरणे जॉब मार्केटला उद्ध्वस्त करत आहेत,’ असे म्हटले. डेमोक्रॅट सेनेटर चक शूमर यांनीही, ‘ट्रम्प यांची टॅरिफ आणि अव्यवस्थित धोरणे अर्थव्यवस्थेचे (Economy) नुकसान करत आहेत,’ असे सांगत ही धोक्याची घंटा असल्याचे म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com