Donald Trump
Donald TrumpDainik Gomantak

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

Donald Trump on India Russia: अत्यंत गूढ आणि छद्मी वृत्तीच्या चीनच्या हाती आम्ही भारत आणि रशियाला बहुदा गमावले आहे, असे विधान करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय.
Published on

वॉशिंग्टन: अत्यंत गूढ आणि छद्मी वृत्तीच्या चीनच्या हाती आम्ही भारत आणि रशियाला बहुदा गमावले आहे, असे विधान करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबरोबरील राजनैतिक संबंध विकोपाला गेले असल्याचे सूचित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच केलेल्या चीन दौऱ्यावेळी रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेत चर्चा केल्याबद्दल ट्रम्प यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.

Donald Trump
Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सोशल मीडियावर मोदी, जिनपिंग आणि पुतीन यांचे एकत्रित छायाचित्र प्रसिद्ध करत त्यावर मत व्यक्त केले. ‘चीनबरोबरील वादात आम्ही भारत आणि रशियाला गमावले आहे,’ असे म्हणतानाच ट्रम्प यांनी ‘त्यांची भागीदारी दीर्घकाळ टिकावी आणि त्यांना समृद्ध भविष्य असावे, अशी माझी इच्छा आहे,’ असा तिरकस टोलाही त्यांनी मारला.

अमेरिकेने भारतावर ५० टक्के आयातशुल्क लागू केल्यापासून दोन्ही देशांचे संबंध तणावाचे झाले आहेत. त्यातच मोदी यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेला हजेरी लावत जिनपिंग आणि पुतीन यांच्याबरोबर स्वतंत्रपणे चर्चा केल्यापासून अमेरिकेचा तीळपापड झाला असून ट्रम्प आणि त्यांच्या मंत्र्यांनी भारतावर टीका करण्याचे धोरण अवलंबिले आहे.

Donald Trump
Goa Crime: सोशल मीडियावर केली मैत्री, 90 लाखांना घातला गंडा, युवतीवर केला लैंगिक अत्याचार; संशयिताला सशर्त जामीन

बड्या कंपन्यांच्या ‘सीईओं’ना निमंत्रण

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील बड्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर गुरुवारी बैठक घेत उद्योग आणि गुंतवणूक या मुद्द्यांवर चर्चा केली. यामध्ये मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्‌स, मायक्रोसॉफ्टेचे सीईओ सत्य नाडेला, ‘मेटा’चे सीईओ मार्क झुकेरबर्ग, ‘ॲपल’चे सीईओ टीक कुक आणि ‘गुगल’चे सीईओ सुंदर पिचाई यांचा समावेश होता. ‘हे सर्व लोक उद्योग क्षेत्रात क्रांती घडवून आणत आहेत,’ असेही डोनाल्ड ट्रम्प यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com