Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प Apple CEO टिम कुक यांना सांगतायेत, 'भारतात कारखाने उभारण्याची गरज नाही'

Donald Trump In Doha Qatar: ट्रम्प यांच्या मते, अॅपलने फक्त भारतीय बाजारपेठेला लक्ष्य करण्यासाठी भारतात कारखाना बांधावा.
Donald Trump
Donald TrumpSocial Media X
Published on
Updated on

दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कुणाचे कायम शत्रू नाहीत आणि मित्रही. त्याची झलक भारताला पाहावयास मिळते आहे. आता दोहा येथील एका परिषदेतील त्यांचे एक प्रतिपादन भलतेच चर्चेत आले आहे. ट्रम्प यांनी अॅपलचे सीईओ टिम कुक यांना सांगितले आहे की, भारतात कारखाने उभारण्याची गरज नाही. आम्हाला तुमच्या भारतात होणाऱ्या उत्पादनात रस नाही.

गुरुवारी कतारची राजधानी दोहा येथे व्यावसायिक नेत्यांसोबत झालेल्या कार्यक्रमात ट्रम्प यांनी अॅपलच्या सीईओंसोबत झालेल्या संभाषणाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अॅपल आता अमेरिकेत उत्पादन वाढवेल. ट्रम्प यांच्या मते, अॅपलने फक्त भारतीय बाजारपेठेला लक्ष्य करण्यासाठी भारतात कारखाना बांधावा. त्याच वेळी ट्रम्प यांनी कार्यक्रमात असेही म्हटले की भारताने आम्हाला व्यापारात शून्य शुल्क कराराची ऑफर दिली आहे.

Donald Trump
North Korea: 'युद्धासाठी तयार रहा'; किम जोंग यांचे उत्तर कोरियाच्या लष्कराला आदेश

भारत आमच्याकडून व्यापारात कोणतेही शुल्क आकारण्यास तयार नाही. अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी अलिकडच्या एका मुलाखतीत म्हटले आहे की, अमेरिकेच्या बाजारपेठेत विकले जाणारे ५०% आयफोन भारतात तयार केले जात आहेत. एप्रिल-जून तिमाहीत अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या आयफोनसाठी भारत हा मूळ देश बनेल, असे कुक म्हणाले.

अॅपल भारतावर इतके लक्ष का केंद्रित करते?

भारत चीनपेक्षा कमी किमतीत कामगार पुरवतो, ज्यामुळे तो आर्थिकदृष्ट्या अधिक आकर्षक बनतो. याव्यतिरिक्त, स्थानिक पातळीवर उत्पादन केल्याने कंपनीला इलेक्ट्रॉनिक्सवरील उच्च आयात खर्च टाळण्यास मदत होते. भारताच्या मेक इन इंडिया उपक्रम आणि उत्पादन संलग्न उपक्रम (पीएलआय) योजना स्थानिक उत्पादन वाढवण्यासाठी कंपन्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करतात. या धोरणांमुळे फॉक्सकॉन आणि टाटासारख्या अॅपलच्या भागीदारांना भारतात अधिक गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळाले आहे.

Donald Trump
Lairai Stampede: चेंगराचेंगरीत बळी पडलेल्यांना सरकारकडून नक्कीच न्याय मिळणार; राज्यपालांनी व्यक्त केला विश्वास

सद्यस्थिती काय आहे?

१) चीनच्या तुलनेत कमी दरांमुळे कंपनी भारत १ आणि व्हिएतनामला प्राधान्य देत आहे. चीनमधील उच्च आयात शुल्काच्या तुलनेत भारत आणि व्हिएतनाममधून आयातीवर फक्त १०% कर आहे.

२) साल २०२६ पर्यंत देशात दरवर्षी ६ कोटी २ आयफोन तयार होतील. अॅपल चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी त्याची पुरवठा साखळी चीनबाहेर हलवण्यावर बऱ्याच काळापासून काम करत आहे.

३) आयफोनच्या उत्पादनात सध्या चीनचे वर्चस्व आहे. आयडीसीच्या मते. २०२४ मध्ये कंपनीच्या जागतिक आयफोन शिपमेंटमध्ये याचा वाटा अंदाजे २८% असेल असा अंदाज होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com