Donald Trump: आयातशुल्काचा धक्का, भारतावर 25 टक्के कराची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, दंड देखील आकारणार

Donald Trump import duty on India: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज भारतावर २५ टक्के आयातशुल्क लागू करण्याची घोषणा केली.
Donald Trump, Narendra Modi
Donald Trump, Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के आयातशुल्क लागू करण्याची घोषणा केली. हा कर एक ऑगस्टपासून लागू होणार आहे. भारताबरोबरील व्यापारतूट प्रचंड मोठी आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. भारत आणि अमेरिकेतील संभाव्य व्यापार कराराच्या चर्चेत अडथळा आल्याचेच हे निदर्शक मानले जाते.

मागील चार महिन्यांपासून ‘आयात शुल्क धोरण’ हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या परराष्ट्रनीतीचा भाग बनला असल्याचे चित्र आहे. ट्रम्प यांनी आज ‘एक्स’वर पोस्ट करत भारतावर २५ टक्के आयातशुल्क लागू करण्याची घोषणा केली.

याबाबतचे सूतोवाच त्यांनी कालच (ता. २९) केले होते. भारताकडून अमेरिकी वस्तूंवर मोठ्या प्रमाणावर कर लादला जात असल्याच्या आपल्या दाव्याचा पुनरुच्चार करतानाच ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून प्रचंड प्रमाणात लष्करी साहित्य आणि इंधन खरेदी करणे, अमेरिकेला नको असलेले व्यापार अडथळे निर्माण करणे अशी कारणेही आयातशुल्कात वाढ करताना दिली आहेत.

Donald Trump, Narendra Modi
Goa Assembly: घरे नियमनाचे पहिले पाऊल! सरकारी जमिनींवरील 400 चौ.मी. जागेतील बांधकामे होणार नियमित, विधेयक सादर

तसेच, या २५ टक्के आयातशुल्का बरोबरच भारताला एक ऑगस्टपासून दंडही भरावा लागणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

Donald Trump, Narendra Modi
Goa Schools: राज्यातील शाळांमध्ये आता 'वॉटर ब्रेक'! विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी मिळणार 2 मिनिटांचा वेळ; शिक्षण खात्याचा निर्णय

भारतावर अमेरिकेने आकारलेले २५ टक्के शुल्क निराशाजनक आहे. ट्रम्प यांनी दंड आकारणार असे म्हटले असले तरी ते नेमके काय करणार हे स्पष्ट नाही. येत्या काही महिन्यांत भारत आणि अमेरिकेचा द्विपक्षीय करार होईल आणि हे शुल्क लक्षणीयरीत्या कमी होईल अशी अपेक्षा आहे.

- डॉ. अजय सहाय, निर्यात संघटनेचे महासंचालक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com