"करारासाठी इराण रडकुंडीला आला होता, मी नाही!", मोजतबा खामेनेईंच्या दाव्यावर भडकले ट्रम्प; विरोधी पक्षालाही घेतले फैलावर VIDEO

Donald Trump React Mojtaba Khamenei Statement: इराणचे सुप्रीम लीडर मोजतबा खामेनेई यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पारा चांगलाच चढला.
Donald Trump React Mojtaba Khamenei Statement
Donald Trump Mojtaba KhameneiDainik Gomantak
Published on
Updated on

Donald Trump React Mojtaba Khamenei Statement: इराणचे सुप्रीम लीडर मोजतबा खामेनेई यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पारा चांगलाच चढला. इराणसोबत झालेल्या युद्धानंतर डेमोक्रेटिक पक्षाकडून इराण अधिक मजबूत झाल्याचा जो दावा केला जात आहे, त्यावरही ट्रम्प यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ट्रम्प यांनी या दोन्ही बाजूंच्या दाव्यांवर कडाडून पलटवार करत आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडवून दिली.

ट्रम्प म्हणाले की, अणुकरारासाठी अमेरिका (America) नाही, तर इराण स्वतः अत्यंत व्याकुळ झाला होता. करारावर स्वाक्षरी व्हावी म्हणून इराणने अमेरिकेसमोर आणि मध्यस्थी करणाऱ्या देशांसमोर अक्षरशः लोटांगण घातले होते. जे लोक युद्धानंतर इराण अधिक शक्तिशाली बनल्याचे सांगत आहेत, ते निव्वळ मूर्ख आहेत; कारण वास्तव हेच आहे की अमेरिकेने इराणला पूर्णपणे उद्ध्वस्त केले.

Donald Trump React Mojtaba Khamenei Statement
US Iran Peace Deal: "आम्ही अमेरिकेचे गुलाम नाही!" नेतन्याहूंच्या मंत्र्याचा ट्रम्प यांच्या शांतता करारावर थेट हल्ला; जागतिक राजकारणात खळबळ

ट्रम्प यांनी दावा केला की, वॉशिंग्टनने नाही तर तेहराननेच युद्ध थांबवण्यासाठी आणि कराराची चर्चा सुरु करण्यासाठी पुढाकार घेतला होता. आम्ही कोणत्याही हताशतेतून इराणची भेट घेतली नाही, तर इराणनेच हतबल होऊन आमच्याशी संपर्क साधला होता. इराणचा खेळ आता संपला असून अमेरिकेने त्याला चारीमुंड्या चित केले. अमेरिका आपल्या भूमिकेवर ठाम राहील आणि तेहरानला कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत करणार नाही. आम्ही अणुकराराच्या पुढील प्रक्रियेसाठी पूर्ण 60 दिवस वाट पाहू, परंतु इराणला अमेरिकेकडून एक पैसाही मिळणार नाही, अगदी दहा सेंटची मदतही केली जाणार नाही, असा थेट इशारा ट्रम्प यांनी दिला.

Donald Trump React Mojtaba Khamenei Statement
US Iran Peace Deal: अमेरिका-इराण शांतता कराराला इस्रायलचा सुरुंग; नेतन्याहूंचा ट्रम्प यांना फोन, लेबनॉनमधून सैन्य मागे घेण्यास साफ नकार

इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी ट्रम्प यांच्यावर थेट निशाणा साधल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची ही आक्रमक प्रतिक्रिया आली. मोजतबा यांनी दावा केला होता की, अमेरिकन नेते करारासाठी उत्सुक होते आणि तो पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा दबाव आणत होते. अमेरिका-इराण कराराच्या मसुद्यावर स्वाक्षरी झाल्यानंतर मोजतबा यांनी पहिल्यांदाच जाहीर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, सुरुवातीला त्यांनी या कराराला विरोध केला होता, परंतु इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियान आणि सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी देशाच्या हिताचे रक्षण करण्याचे आश्वासन दिल्यानंतरच त्यांनी या कराराला मंजुरी दिली.

Donald Trump React Mojtaba Khamenei Statement
US Strikes Iran: अमेरिकेकडून इराणवर हवाई हल्ला; ट्रम्प यांच्या न्यूक्लियर डीलच्या दाव्यादरम्यान मिडल ईस्टमध्ये पुन्हा तणाव

या सर्व घडामोडींवरुन ट्रम्प यांनी अमेरिकेतील विरोधी पक्ष असलेल्या डेमोक्रेटिक पक्षाचीही जोरदार खिल्ली उडवली. ट्रम्प म्हणाले की, युद्धामुळे इराणची लष्करी क्षमता पूर्णपणे नष्ट झाली. त्याची वायू सेना, नौदल आणि हवाई संरक्षण यंत्रणा भुईसपाट झाली. असे असतानाही डेमोक्रॅट्स म्हणतात की, इराणची स्थिती चार महिन्यांपूर्वीच्या तुलनेत आता चांगली आहे. हे लोक इतके मूर्ख कसे असू शकतात? इराणला मजबूत समजण्याची चूक त्यांनी करु नये.

Donald Trump React Mojtaba Khamenei Statement
Iran US War: "खरा खेळ अजून सुरुच व्हायचाय!" इराणचा अमेरिका-इस्रायलला थेट इशारा; गुढ क्षेपणास्त्रांबाबत रशियाच्या दाव्यावर शिक्कामोर्तब

खरी परिस्थिती ही आहे की, अमेरिकेने इराणला उद्ध्वस्त करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही आणि जर इराणने या अटींवर अणुकरार केला नाही, तर त्याचे अस्तित्व पृथ्वीवरुन पुसून टाकू, असा थरारक आणि आक्रमक इशारा ट्रम्प यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com