VIDEO: "एरिका कुठेय?" भर समारंभात बोलावून डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं Kiss, ओव्हल ऑफिसमधील व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल

Donald Trump Viral Video: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Donald Trump Viral Video
Donald TrumpDainik Gomantak
Published on
Updated on

Donald Trump Viral Video: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. त्यांच्या या व्हिडिओने नवा वाद निर्माण केला आहे. ट्रम्प यांनी सोमवारी (10 नोव्हेंबर) दुपारी ओव्हल ऑफिसमध्ये एका समारंभादरम्यान कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे कार्यकर्ते आणि 'टर्निंग पॉइंट यूएसए'चे संस्थापक दिवंगत चार्ली किर्क यांच्या पत्नी एरिका किर्क यांना भर समारंभात किस केले.

हा प्रकार त्या वेळी घडला, जेव्हा भारतासाठी अमेरिकेचे (America) राजदूत म्हणून सर्जियो गोर यांचा शपथविधी समारंभ सुरु होता. समारंभाला डझनभर लोक उपस्थित असताना ट्रम्प यांनी अचानक एरिका यांना बोलावून किस केले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली.

Donald Trump Viral Video
Donald Trump: टॅरिफमुळे अमेरिका बनला जगातील 'सर्वात श्रीमंत देश', डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा; म्हणाले, 'प्रत्येक नागरिकाला 2000 डॉलर देणार...'

ओव्हल ऑफिसमधील 'तो' क्षण

सर्जियो गोर यांच्या शपथविधी समारंभापूर्वी, ट्रम्प यांनी अचानक उपस्थितांना विचारले, "एरिका कुठे आहे?" त्यानंतर त्यांनी एरिका किर्क यांना जवळ बोलावले. एरिका जवळ येताच ट्रम्प यांनी त्यांच्या गालाचे चुंबन घेतले. चार्ली किर्क यांच्या नुकत्याच झालेल्या हत्येनंतर एरिका किर्क यांना भावनिक आधार देण्यासाठी ट्रम्प यांनी हे कृत्य केले असावे, असा युक्तिवाद काही समर्थकांनी केला. एरिका किर्क या 'प्रोकलेम मीडिया'च्या संस्थापिका असून त्या ट्रम्प यांच्या समर्थक आहेत. त्या या समारंभात ट्रम्प आणि उपराष्ट्रपती जेडी व्हॅन्स यांच्यासोबत उपस्थित होत्या.

Donald Trump Viral Video
Donald Trump Dance: मलेशियात उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका! सोशल मीडियावर 'तो' भन्नाट डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल; तुम्ही पाहिलाय का? VIDEO

राजकीय आणि सार्वजनिक टीका

ट्रम्प यांच्या या कृत्यावर अनेक लोकांनी कडक शब्दांत टीका केली. अनेक समीक्षकांनी या सार्वजनिक चुंबनाला 'सर्वथा अनुचित' ठरवले, विशेषतः ओव्हल ऑफिससारख्या महत्त्वाच्या ठिकाणी आणि सार्वजनिक समारंभात असे कृत्य करणे योग्य नाही, असे त्यांनी मत नोंदवले. हा व्हिडिओ यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर वेगाने व्हायरल होत आहे. 'अजीब' आणि 'अनावश्यक' अशा प्रतिक्रिया देत अनेक यूजर्संनी #PredatorInChief हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करायला सुरुवात केली आहे.

अनेकांनी ट्रम्प यांच्या या कृतीला महिलांबद्दल असंवेदनशील असल्याचे म्हटले. त्याचवेळी, विरोधी पक्षाचे नेते या घटनेला ट्रम्प यांच्या जुन्या वादग्रस्त प्रतिमेशी जोडून पाहत आहेत, जिथे ट्रम्प यांना महिलांशी संबंधित अनेक वादांमुळे टीकेचा सामना करावा लागला.

Donald Trump Viral Video
Donald Trump Oil Claim: 'भारत रशियाकडून तेलाची खरेदी थांबवणार'! ट्रम्प यांच्या नवा दाव्यामुळे चर्चेला उधाण

उपराष्ट्रपती व्हॅन्स यांच्यासोबतचा जुना वाद

यापूर्वी, एरिका किर्क आणि उपराष्ट्रपती जेडी व्हॅन्स यांचाही असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यात जेडी एरिका यांचे आलिंगन देताना दिसले होते. त्या व्हिडिओवरही टीका झाली होती. मात्र, आता ट्रम्प यांचे किस प्रकरण प्रामुख्याने चर्चेचा विषय बनले आहे. एकंदरीत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या या कृत्यामुळे त्यांच्यावर पुन्हा एकदा राजकीय आणि सार्वजनिक टीका होत असून, सोशल मीडियावर या व्हिडिओने मोठी खळबळ उडवून दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com